Weather Update
Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात गुलाबी थंडीचे आगमन

टीम ॲग्रोवन

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे (Cold Wind) राज्यात गुलाबी थंडीचे (Pink Winter) आगमन झाले आहे. खानदेशात हुडहुडी (Cold Weather) कायम असून, पारा १० अंशांखाली घसरल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा देखील गारठला आहे. राज्यात थंडी कायम राहणार असली तरी किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढतच असून, राजस्थान येथील चुरू येथे सोमवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत निचांकी ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात निचांकी ७ अंश, तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारातही किमान तापमान ८ अंश सेल्सअस तापमानाची नोंद झाली. धुळे आणि निफाडसह, जळगाव, नाशिक, पुणे औरंगाबाद, परभणी, आणि यवतमाळ येथे किमान तापमानाचा पारा १० अंश किंवा त्यापेक्षा अधिक घसरला असून, किमान तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्याने थंडीची लाट आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी दिवसाही गारठा जाणवत आहे. आज (ता. २२) थंड व कोरड्या हवामानासह किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

तीव्र कमी दाब क्षेत्र निवळणार

बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) श्रीलंकेच्या जाफनापासून ५२० किलोमीटर ईशान्येकडे, काराईकलपासून ४७० किलोमीटर ईशान्येकडे, मच्छलीपट्टणमपासून आग्नेयेकडे ५५० किलोमीटर, चेन्नईपासून ४२० किलोमीटर आग्नेयेकडे होते. वायेव्यकडे सरकणारी ही प्रणाली सोमवारी (ता.२१) रात्री उशिरापर्यंत तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. किनाऱ्याला धडकताच आज (ता. २२) सकाळपर्यंत ही प्रणाली हळूहळू निवळण्याची शक्यता आहे.

- खानदेशात हुडहुडी कायम

- निफाड येथे निचांकी ७ अंश तापमान

- मध्य महाराष्ट्र, मराठवाडा गारठला

- दिवसाच्या कमाल तापमानातही घट

- किमान तापमानात चढ-उतार शक्य

सोमवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २८.३ (८.८), नगर - (१०.१), जळगाव २९.३ (८.२), धुळे २८.० (७.४), कोल्हापूर २८.२ (१४.८), महाबळेश्वर २४.२(१०.४), नाशिक २७.१ (९.२), निफाड २९.२ (७.०), सांगली २९.२(१२.५), सातारा २८.५(१३.०), सोलापूर ३१.० (१२.७), सांताक्रूझ ३२.१(१७.०), डहाणू ३१.८ (१६.५), रत्नागिरी ३२.६ (१७.२), औरंगाबाद २८.० (८.९), नांदेड - (१२.६), परभणी २८.५ (११.०), अकोला ३०.१ (१२.०), अमरावती २९.४ (११.७), बुलढाणा २८.२ (११.६), ब्रह्मपूरी ३०.४ (१३.२), चंद्रपूर २७.२ (१३.२), गडचिरोली २८.४(१३.८), गोंदिया २७.८(१०.५), नागपूर २८.० (११.४), वर्धा - (१२.२), वाशीम ३१.४ (१३.२), यवतमाळ २९.५ (१०.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT