Land Acquisition  Agrowon
ताज्या बातम्या

Land Acquisition : ‘भूसंपादनाच्या दरनिश्‍चितीसाठी विशेष समिती स्थापन करा’

Latest Agriculture News : परभणी जिल्ह्यातील जात असलेल्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या शेत जमिनींचे मूल्यांकन करत असताना प्रत्यक्ष बाजारभाव ठरवण्यासाठी शासनाने विशेष समिती स्थापन करावी.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील जात असलेल्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या शेत जमिनींचे मूल्यांकन करत असताना प्रत्यक्ष बाजारभाव ठरवण्यासाठी शासनाने विशेष समिती स्थापन करावी. त्या समितीमध्ये प्रत्येक तालुक्याचा एक शेतकरी प्रतिनिधी घ्यावा आदी मागण्या शेतकरी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे करण्यात आल्या.

या द्रुतगती महामार्गासाठी केले जात असलेल्या शेत जमिनींचे मूल्यांकन स्वतंत्र स्वरूपात देण्यात यावे. शेतकऱ्यांना योग्य मावेजा द्यावा. २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार प्रमाणे भूसंपादन करावे.

महाराष्ट्र महामार्ग कायदा १९५५ नुसार जमीन देण्यास शेतकऱ्यांचा नकार आहे. गावातील शेतीचा मोबदला दर निश्‍चित करण्यासाठी जवळील गावाचा रेडीरेकनर दर लक्षात‌ घ्यावा. गावच्या शेतीचे मूल्यांकन करताना या गावच्या सर्वाधिक आकारणी दर घेऊन सदरील गावचे मूल्यांकन करावे.

ज्या शेतामध्ये पाण्याचा स्रोत विहीर, बोअरवेल, कॅनॉल, शेततळे, पाझर तलाव याद्वारे सिंचन व्यवस्था आहेत व सद्यःस्थितीत बारमाही बागायती पिके आहेत. या जमिनीचे मूल्यांकन बारमाही बागायती म्हणून करण्यात यावे.

मूल्यांकन ॲवॉर्ड जाहीर करते वेळी त्यात फळझाडे, रानटी झाडे, विहीर, बोअरवेल, बांधकाम, शेडनेट, तारकुंपण, पाइपलाइन, ठिंबक पाइपलाइन आदी तपशिलासह शेत जमिनींचे स्वतंत्र मूल्यांकन देण्यात यावे या मागण्या परभणी जिल्हा महामार्ग शेतकरी कृती समिती समितीतर्फे करण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT