Agricultural University Agrowon
ताज्या बातम्या

Soil Institute Conference: महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून भारतीय मृद विज्ञान विभागाचे अधिवेशन

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातर्फे भारतीय मृद विज्ञान संस्थेचे ८६ वे वार्षिक अधिवेशन (ता. १५ ते १८) नोव्हेंबर दरम्यान, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आले आहे.

Team Agrowon

नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, (Agricultural University) राहुरी अंतर्गत मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातर्फे भारतीय मृद विज्ञान संस्थेचे ८६ वे वार्षिक अधिवेशन (ता. १५ ते १८) नोव्हेंबर दरम्यान, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनास भारतातील सर्व मृदशास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात होणाऱ्या या अधिवेशनात पीक उत्पादनात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जमीन आहे. जमिनीच्या आरोग्याबाबत, सुपिकतेबाबत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, पर्यावरण व जैवविविधता तसेच शेतकऱ्यांना शेती करताना येणाऱ्या समस्या व त्यावरील नियोजन या विषयावर परिसंवादाचे व स्मृती व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रसारण केंद्रातर्फे देण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्‌घाटन राज्याचे महसुल व पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक नवी दिल्ली डॉ. हिमांशू पाठक, डॉ. सुरेशकुमार चौधरी, उपमहासंचालक (नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन), नवी दिल्ली हे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील हे भूषविणार आहेत. विविध कारणांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. मातीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने (ता. १६) नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांसाठी ‘शाश्वत शेतीसाठी मृदव्यवस्थापन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजन समितीकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT