Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे तीळ, ज्वारी धोक्यात

Team Agrowon

Yavatmal Rain Damage News : वैशाख महिन्याच्या रणरणत्या उन्हात सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) उन्हाळी तीळ व ज्वारी पीक (Jowar Crop) धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडणार असल्याचे चित्र आहे.

पुसद परिसरात बागायतीची सोय असणारे शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भुईमूग पिकाची पेरणी करायचे. परंतु निकृष्ट बियाणे, लागवड खर्च, निंदण, खते, फवारणी, पाणी देणे आदींसह काढणीसाठी लागणारा खर्च देखील या पिकातून निघत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून कमी खर्चातील उन्हाळी तीळ व उन्हाळी ज्वारी पिकाला पसंती देत आहेत.

उन्हाळी पांढरी शुभ्र होणारी ज्वारी व गुरांसाठीचा चारा कडबा याची मागणी असल्याने उन्हाळी पिकांतर्गत उन्हाळी तीळ हा पांढरा शुभ्र होत असल्याने भाव खाऊन जातात. उन्हाळी ज्वारी एकरी बारा ते पंधरा क्विंटल होते. खर्च वजा जाता एकरी चाळीस हजार रुपये नफा शेतकऱ्यांना होत असतो.

त्यातच वन्यप्राण्यांकडून कुठलाही धोका नसल्याने शेतकरी उन्हाळी तिळाकडे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वळले आहेत. यंदा ज्वारी व तिळाचे पीक हाती आले असताना अवकाळी पावसामुळे पीक धोक्यात सापडले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ज्वारी आडवी पडल्यामुळे कणसे काळवंडत आहेत. तर, काही कणसांना कोंबसुद्धा फुटत आहेत.

पुसद परिसरातील डॉ. सचिन कोठारी यांच्या दोन एकर क्षेत्रांतील काढणीसाठी आलेली ज्वारी आडवी झाली आहे. उन्हाळी ज्वारी १०९ हेक्टर, तर तिळाची पेरणी ४१ हेक्टरवर करण्यात आल्याचा अहवाल कृषी विभागाने घोषित केला आहे.

त्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. उभ्या असलेल्या ज्वारीच्या कणसात पाणी जाऊन बुरशी लागून अळ्या पडण्याबरोबरच ज्वारी काळवंडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. महसूल व कृषी विभागाने नुकसानाची पाहणी करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT