Fodder Shortage  Agrowon
ताज्या बातम्या

Fodder Shortage : चारा टंचाईचे संकट गंभीर

Team Agrowon

Pune News : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईबरोबर चाराटंचाईदेखील जाणवू लागली आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सध्याच ४४ टक्के चाऱ्याची तूट असून, पुढील हंगामात ती वाढत जाण्याची शक्यता आहे. दुष्काळीस्थितीत शेतकरी दूध उत्पादन, शेळी-मेंढीपालन आदी पूरक व्यवसाय विसंबून असतो, अशाच कमी दूधदर, वाढते चाऱ्याचे दर आणि टंचाई जाणवू लागल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.

देशात सर्वाधिक दूध उत्पादन करणारे महाराष्ट्र हे सहावे राज्य आहे. महाराष्ट्रात २०२१-२२ या वर्षात एकूण १ कोटी ४३ लाख ५ हजार टन दूध उत्पादन झाले. ८० टक्के अल्पभूधारक संख्या असलेल्या राज्यात शेती व्यतिरिक्त दूध व्यवसायावर शेतकरी विसंबून आहे.

शाश्‍वत उत्पादन असले, तरी उत्पादन खर्चापेक्षाही कमी दूधदरामुळे सध्या शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशातच दुष्काळस्थितीमुळे चारा, पशुखाद्याचे दरही वधारल्याने त्यांची चिंता वाढली आहे. सरकारने उत्पादनखर्चातील दरवाढ रोखण्याकरिता आणि चाऱ्याकरिता अधिक प्रोत्साहन देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

दरम्यान, चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणेवाटप करण्यात येत आहे. यामध्ये ज्या पशुपालकांकडे तीन ते चार पशुधन आहे.

अशा पशुपालकांना प्राधान्याने १०० टक्के अनुदानावर दीड हजार रुपयांच्या वैरण बियाण्यांचा आणि ठोंबांचा पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये ज्वारी, बाजरी, मका, बरसिम, लुसर्न, नेपियर, यशवंत, जयवंत या गवत प्रजातींच्या ठोंबेवाटप करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

या वैरणीची बियाणे ठोंबांचा पुरवठा कृषी विद्यापीठे, महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळाची प्रक्षेत्रे, बियाणे महामंडळ, महाबीज, पशू विज्ञान विद्यापीठांकडून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुरघास निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी सायलेज बॅग खरेदीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी पाच हजार किलोच्या मुरघास निर्मिती प्रकल्पासाठी ३ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी एका जिल्ह्यात १ हजार पशुपालकांची निवड करण्यात येणार असून, याकरिता प्रति जिल्हा ६० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

मुरघास वापरासाठी अनुदान

मुरघास खरेदीसाठी कमाल २ दुधाळ पशुधनासाठी ३३ टक्के अनुदानातून ७ हजार ३०० रुपये अनुदान प्रतिवर्षी देण्यात येत आहे. यासाठी एका जिल्ह्यात १ हजार पशुपालकांसाठी ७३ लाखांच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. मुरघास खरेदीसाठी आधारभूत किंमत निश्‍चित केली आहे. मक्यापासून तयार करण्यात येणाऱ्या मुरघासाची किंमत प्रतिकिलो ६.५० रुपये असणार आहे. त्यानुसार हवाबंद मुरघास खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.

गावातील शेतकऱ्यांचा पूरक उद्योग म्हणजे दुग्ध व्यवसाय. शेतकऱ्यांना जनावरासाठी उसाचा चारा ४००० रुपये प्रति टनाने विकत आणून खाऊ घालण्याची वेळ आली. पाऊस आला नाही तर पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचे संकट गंभीर होईल.
- बाबूराव ताठे, गेवराई सेमी, जि. छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्रातील पशुधन (२०१९)

गोवंश : १ कोटी ३९ लाख ९२ हजार ३०४

म्हैस वंश : ५६ लाख ३ हजार ६९२

शेळी : १ कोटी ६ लाख ४ हजार ८८३

मेंढी : २६ लाख ८० हजार ३२९

राज्यातील चाराटंचाईस्थिती...

- खानदेशात चाराटंचाई वाढणार; चारा पिकांची पेरणीच कमी.

- मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न बिकट.

- सोलापूर जिल्ह्यात पाऊस लांबल्यास संकट वाढणार.

- परभणी जिल्ह्यात अवर्षणाच्या स्थितीमुळे चाराटंचाई.

- सातारा जिल्ह्यात चाराटंचाईची भीषणता वाढली.

- सांगली जिल्ह्यात चाराटंचाईची तीव्रता वाढली.

- नगर जिल्ह्यात चाराटंचाईच्या शक्यतेने उपाययोजनांवर भर.

- वऱ्हाडात चाऱ्याची टंचाई भेडसाविण्याची चिन्हे.

- रत्नागिरी जिल्ह्यांत मका, चवळी, शुगर ग्रेस लागवड करणार.

चाऱ्याचे दर..

जिल्हा --- ओला चारा --- सुका चारा --- पशूखाद्य --- ऊस चारा --- मुरघास

यवतमाळ --- हरभरा कुटार ६०० ते ६५० --- सरकी ढेप २९०० ते ३२०० क्विंटल --- ३५० रुपये क्‍विंटल ---६५० ते ७०० रुपये क्‍विंटल

सोलापूर ---३,५०० रुपये प्रतिटन --- प्रतिपेंढी-१० ते १५ रुपये ---५० किलो - १७०० रुपये दर ---२,५०० प्रतिटन ---६ ते ८ रुपये प्रतिकिलोचा दर

छत्रपती संभाजीनगर ---७०० ते १००० शेकडा ---३००० रुपये शेकडा --- ३७०० ते ४००० रुपये क्विंटल ---३५०० ते ४००० रुपये टन ---६ ते ७५०० रुपये टन

अकोला --- ४ ते ६ प्रति किलो ---७ रुपये प्रति किलो ---३० रुपये प्रति किलो --- ७ रुपये प्रति किलो

सातारा --- मका १५०० ते १७०० गुंठा ---कडबा प्रति शेकडा ३००० ते ३५०० रुपये ---१२०० ते १७०० क्विंटल ---३००० रुपये टन --- ६००० ते ८००० टन

नाशिक --- ४,००० ते ४,५०० --- ३,५०० ते ४,००० ---३,४०० ते ४,००० ---४,००० ते ४,५०० ---६,००० ते ७,०००

पुणे --- मका ३०००-३२०० रुपये टन --- ४-५ हजार रुपये टन ---एक बॅग १५००-१७०० रुपये ---२८००-३२०० रुपये टन ---जाग्यावर ७००० रुपये टन

परभणी --- मका प्रतिपेंढी १५ ते २० रुपये ---ज्वारीचा कडबा प्रतिशेकडा ३००० ते ४००० ---सरकी पेंड प्रतिक्विंटल ३१०० रुपये --- प्रतिपेंढी २५ रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT