Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : पाच जिल्ह्यांत पिकांवर संकटांची मालिका कायम

टीम ॲग्रोवन

लातूर : लातूर विभागातील पाच जिल्ह्यांत खरीप हंगामाचे (Kharif season Crop Acreage) सरासरी क्षेत्र २९३५८४४ हेक्टर असून, २७६२४८९ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी (Kharif Sowing) झाली आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी सोयाबीनवर पिवळा मोझॅक (Yellow Mosaic On Soybean), पाने खाणारी अळी, खोडमाशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तर कपाशीवर (Cotton Pest) मावा, तुडतुडे करपा तसेच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव (Pink Boll Worm Outbreak) झाला आहे. पिकावरील संकट यंदा नाव घेत नसल्याची स्थिती आहे.

विभागातील पीकनिहाय स्थिती

खरीप ज्वारी : लातूर विभागात खरीप ज्वारी पिकाचे सरासरी क्षेत्र ९४१७८ हेक्टर असून, ३३७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ३६ आहे. पीक सध्या वाढीच्या, पोटरी व कणसे भरण्याच्या अवस्थेत आहे. नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

तूर ः तुरीचे सरासरी क्षेत्र ३४९२५३ हेक्टर असून, २५६३०० हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ७३ इतकी आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

मूग ः मुगाचे सरासरी क्षेत्र ९६८३९ हेक्टर असून, ५९५१३ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली. त्याची टक्केवारी ६१ इतकी आहे. पीक सध्या काढणी अवस्थेत असून, ७० ते ८० टक्के पिकाची काढणी झाली आहे.

उडीद ः उडदाचे सरासरी क्षेत्र ९८९२७ हेक्टर असून, ७५६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ती सरासरीच्या ७६ टक्के आहे. पीक सध्या काढणी अवस्थेत असून, ३० ते ४० टक्के काढणी पूर्ण झाली आहे.

सोयाबीन ः सोयाबीनचे पिकाचे सरासरी क्षेत्र १५७१८६८ हेक्टर असून, प्रत्यक्षात १९११३२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. ती सरासरी क्षेत्राच्या १२२ टक्के आहे. पीक सध्या शेंगा लागण्याच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे.

कापूस ः कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र ४८५०८८ हेक्टर असून, प्रत्यक्ष ४०२०६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ते ८३ टक्के आहे. पीक सध्या वाढीच्या, पाते, फ़ुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे.

सोयाबीनवर पिवळा मोझॅक, पाने खाणारी अळी

लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. नियंत्रणासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे प्रादुर्भाव कमी झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. नांदेड व परभणी जिल्ह्यांत पिकावर अल्प प्रमाणात पाने खाणारी अळी, खोडमाशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. पाचही जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात बहुतांश महसूल मंडलांत १५ ते २१ दिवसांचा पावसाचा खंड पडल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. लातूर, उस्मानाबाद, नांदेड व परभणी जिल्ह्यांनी मध्य हंगाम अधिसूचना काढली आहे.

कपाशीवर मावा, तुडतुडे, करपा, तसेच गुलाबी बोंड अळी

परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कपाशी पिकावर अल्प प्रमाणात तुडतुडे व मावा या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी क्षेत्रीयस्तरावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे करपा रोगाचा व गुलाबी बोंड अळीची प्रादुर्भावग्रस्त फुले डोमकळी स्वरूपात आढळून येत आहे. नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावणे बाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nursery Business : ‘नर्सरी, लॅंडस्केपिंग, गार्डनिंग’ व्यवसायातील कुशल निकीता

Dairy Business : विदर्भात दुग्ध व्यवसायाला तयार केली बाजारपेठ

Smart Meters : ‘स्मार्ट मीटर्स’ म्हणजेच खासगीकरणाकडे वाटचाल

Cotton Rate : शेतकऱ्यांच्या ‘सोन्या’चे दर कधी वाढणार?

Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

SCROLL FOR NEXT