Indian Agricultural
Indian Agricultural Agrowon
ताज्या बातम्या

Indian Agricultural : महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळेत ज्वारीच्या तंत्रज्ञानावर जागृती

Team Agrowon

सोलापूर ः करमाळा तालुका कृषी अधिकारी (Agricultural Officer) व मंडल कृषी अधिकारी, केतूर यांच्यामार्फत विहाळ येथे खास महिला शेतकऱ्यांसाठी (Women Farmer) रब्बी ज्वारी (Rabbi Jwari) पिकावर शेतीशाळा पार पडली.

ज्वारीच्या पिकातील समस्या आणि त्यावरील उपायांसह त्यातील सुधारित तंत्रज्ञानावर महिला शेतकऱ्यांमध्ये (Farmer) जागृती करण्यात आली.

विहाळच्या सरपंच सौ. पूजा मारकड, उपसरपंच सौ आश्‍विनी चोपडे, विजया हाके, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप हाके, मोहनराव मारकड, गणेश हाके, प्रदीप देवकाते आदी उपस्थित होते.

क्रॉपसॅप योजनेअंतर्गत ही शेतीशाळा झाली. तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, मंडल कृषी अधिकारी देविदास चौधरी, कृषी पर्यवेक्षक नितीन ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक उमाकांत जाधव यांनी यामध्ये महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

प्रामुख्याने ज्वारी पिकातील निरीक्षणासह ज्वारी पिकावरील मावा किडींचे नमुने प्रक्षेत्र भेटीदरम्यान महिला शेतकऱ्यांनी गोळा केले.

प्रक्षेत्र भेट झाल्यानंतर महिला शेतकऱ्यांनी त्याचे चित्रीकरण आणि सादरीकरण केले. मावा किडींचे नमुने गोळा करताना महिला शेतकऱ्यांना त्यासोबत लेडी बर्ड बीटल या मित्र कीटकांचे नमुने सापडले.

सादरीकरण दरम्यान महिला शेतकऱ्यांना कृषी सहायक उमाकांत जाधव यांनी मावा या किडीचा जीवनक्रम मावा किडीचे बोर्डवर चित्र काढून समजावून सांगितले.

मावा किडीचा रंग फिकट हिरवा, फिकट पिवळसर असतो. तसेच मावा किडीचे नुकसानीच्या अवस्था प्रौढ आणि पिले या दोन्ही असतात. त्याचबरोबर मावा कीड पिकाच्या पानाच्या खालच्या बाजूला राहून पानातील रस शोषण करत असते.

त्यामुळे पाने पिवळी पडून झाडाची वाढ थांबते. ज्वारीवरील ‘चिकटा’ हा रोग मावा किडीमुळेच येतो. परिणामी, कडबा/चाऱ्याची प्रत कमी होते. तसेच उत्पन्न ही कमी होते, असे श्री. जाधव यांनी सांगितले. या वेळी महिलांच्या विविध शंकाचे निरसन या वेळी करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

SCROLL FOR NEXT