Rural News Agrowon
ताज्या बातम्या

Seed Bank : ‘शेडशाळची बीज बँक देशापुढे आदर्श ठरेल’

शेडशाळ (ता. शिरोळ) येथे महादेव स्वामी मठ येथे आयोजित स्व. डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशन देशी वाण बीज बँकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

Team Agrowon

कोल्हापूर : ‘‘शेडशाळच्या महिलांनी सुरू केलेले बीज बँकेचे (Seed Bank) काम हे राष्ट्रनिर्माणाचे मोठे काम आहे. याचा प्रचार आणि प्रसार झाल्यास एक सक्षम पिढी तयार होईल.

बीज बँकेची सुरू झालेली ही चळवळ देशापुढे आदर्श ठरेल,’’ असा विश्वास प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केला.

शेडशाळ (ता. शिरोळ) येथे महादेव स्वामी मठ येथे आयोजित स्व. डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशन देशी वाण बीज बँकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री दत्त साखर कारखाना चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील होते. यावेळी शेतकरी व महिलांना बीज वाटपही करण्यात आले.

उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, ‘‘गेल्या तीन वर्षांपासून येथील महिलांनी अतिशय कष्टाने बीज बँक स्थापन करून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

हे काम छोटे वाटत असले तरी जगाच्या दृष्टीने फार मोठे आहे. शिरोळ तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले म्हणाले, ‘‘कीटकनाशके, तणनाशकामुळे तत्त्वांची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत देशी वाण बियाणे हे आरोग्यदायी ठरणार आहे.’’

यावेळी कृषी मंडल अधिकारी निरंजन देसाई, माती परीक्षणाचे ए. एस. पाटील, दत्त कारखान्याचे संचालक भैय्यासाहेब पाटील, विश्वनाथ माने, जयसिंगपूर उदगाव बँकेचे संचालक महेंद्र बागे, सरपंच गजानन चौगुले, उपसरपंच भारती लाड, ग्रामपंचायत सदस्य सुनील संकपाळ, किरण संकपाळ, रोहिणी कोल्हापुरे, सुनीता नाईक, कवठे गुलंद, सरपंच प्रमिला जगताप आदी या वेळी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Seeds Subsidy : महाडीबीटीवर अनुदानित रब्बी बियाण्यांसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा

Soybean Farming : दीड एकरात किलोभर सोयाबीन काढून दाखवा अन् क्विंटलभर काजू-बदाम घ्या

Ghee Karvai Sangamner: अन्न, औषध प्रशासनाच्या कारवाईत अडीच लाखांचा संशयित साठा जप्त

Maharashtra Drought: राज्यात उद्या दुष्काळ जाहीर होणार, शेतकऱ्यांना थेट मदत मिळेल- मुख्यमंत्री फडणवीस

Fishing Business: खराब हवामानाचा मासेमारीला फटका

SCROLL FOR NEXT