Paddy Farming  Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Farming : हंगामी भातशेती बहरली

Kharif Paddy : जूनमध्ये उशिरा पाऊस आल्याने भातशेती धोक्यात येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती.

Team Agrowon

Khopoli News : जूनमध्ये उशिरा पाऊस आल्याने भातशेती धोक्यात येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, जुलैमध्ये दमदार आणि ऑगस्टमध्ये भातशेतीला पूरक असा पाऊस पडला. यामुळे वर्तमानस्थितीत खोपोली-खालापूर परिसरात भातशेती बहरली आहे. भातशेतीची स्थिती उत्तम असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भातशेती अडचणीत आली होती. मात्र जुलै व ऑगस्ट महिन्यातील मुबलक पावसामुळे ही भर निघाली आहे. योग्य वेळी झालेल्या दमदार पावसाने भातशेती बहरल्याने शेतकरी आनंदित आहेत. तर दुसरीकडे तालुक्यातील सर्वच तलाव व धरणे भरल्याने उन्हाळी भातपिकासाठी साठीचा पाण्याचा प्रश्नही सुटला आहे.

खोपोली-खालापूरमध्ये दीड हजार हेक्टरच्यावर क्षेत्रात भातलागवड करण्यात येते. यातील अनेक शेतकरी प्रयोगशील आहेत. खोपोली व कर्जत कृषी संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाने दरवर्षी नवनवीन जातीच्या भाताचे वाण लागवडीसाठी वापरून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

यासाठी तालुका कृषी विभाग ही सक्रिय असल्याने या वर्षी भात शेतीचे चांगले उत्पादन होणे अपेक्षित आहे. भातशेती अतिशय उत्तम आहे. भात तयार होत असून, अवकाळी व परतीचा पावसाची शक्यता व यामुळे होणाऱ्या नुकसानपासून मात्र दिलासा मिळण्याची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT