Farmer Agrowon
ताज्या बातम्या

MPKV, Rahuri : शेती उत्पन्न वाढीत शास्त्रज्ञांचाही हातभार

केंद्रीय कृषी सचिव मनोज अहुजा ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाला भेट

Team Agrowon

नगर ः ‘‘कृषी क्षेत्र हे आव्हानात्मक क्षेत्र आहे. या क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सर्वोकृष्ट कार्य केलेले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात (MPKV, Rahuri औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर, हायपर स्प्रेट्रम तंत्रज्ञानाचा वापर, रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर, स्वयंचलित हवामान केंद्र व सिंचन प्रणाली यामध्ये उत्कृष्ट काम सुरू आहे. देश अन्नधान्याने स्वयंपूर्ण झाला आहे, याचे श्रेय पूर्णपणे कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनाला जाते,’’ असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज अहुजा यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज अहुजा यांनी भेट देऊन संवाद साधला. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव अभिलक्ष लिखी, आयुक्त (उद्यान) डॉ. नवीनकुमार पटले, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे उपसंचालक श्री. होशियार सिंग, अ‍ॅगमार्कचे विपणन विभागाचे संचालक बी. के. जोशी, विपणन अधिकारी सोनाली बागडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कुलसचिव प्रमोद लहाळे,

नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. गोरक्ष ससाणे उपस्थित होते. यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील म्हणाले, ‘‘विद्यापीठाने विकसित विविध पिकांचे वाण हे राज्यातच नव्हे तर बाहेरच्या राज्यातही घेतले जातात. यामध्ये विद्यापीठाने विकसित डाळिंबाचा भगवा हा वाण देशात डाळिंबाच्या ८० टक्के क्षेत्रावर लावला जातो. राज्यातील उसाखालील क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्र हे या विद्यापीठाच्या विकसित वाणांखाली आहे.’’

 यावेळी मान्यवरांना ड्रोनद्वारे औषधाची फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रक्षेत्र भेटीदरम्यान डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. सचिन नलावडे, डॉ. पवन कुलवाल, डॉ. सुनील कदम, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. राजेंद्र हिले, डॉ. जोशी यांनी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo Shetkari 8th Installment : नमोचा आठवा हप्ता पुढच्या आठवड्या जमा होणार; दोन हजार रूपये बँक खात्यावर येणार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची आकडेवारी समोर; राज्यातील ८३ टक्के विवाहित, १.८ टक्के अविवाहित, तर ४.७ टक्के विधवा महिलांना मिळतोय लाभ

Bamboo Plantation: बांबू विकास प्रकल्पांतर्गत सहा लाख रोपांची लातूर जिल्ह्यात लागवड

Villagers Protest: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांविरोधात ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

MAGNET Project: ‘मॅग्नेट’च्या अभ्यासदौऱ्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT