Crop Protection Agrowon
ताज्या बातम्या

Crop Protection : पीक संरक्षणासाठी साड्यांचे कुंपण

Saree Fencing : नैसर्गिक संकटासह वन्यप्राण्यांमुळे शेतातील उभ्या पिकांची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

Team Agrowon

Beed News : नैसर्गिक संकटासह वन्यप्राण्यांमुळे शेतातील उभ्या पिकांची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांमुळे होणारे पीक नुकसान टाळण्यासाठी लिंबागणेश सर्कल मधील शेतकऱ्यांनी शेतांत साड्यांचे कुंपण उभे केले आहे.

दरम्यान वन विभागाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. तसेच वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांवर हल्ला केल्यानंतर किती जणांना मदत मिळाली याविषयी विभागीय वन कार्यालयाकडे उपलब्ध नाही.

प्रशासनाने याबाबत नागरिकांत जागृती करून नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांत असलेला संभ्रम दूर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक) यांच्याकडे केली आहे. सध्या तरी शेतकरी रंगीबेरंगी साड्यांचे शेताभोवती कुंपण करून नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

निवेदनात म्हटले आहे, बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश सर्कल मधील डोंगराळ भागातील पिंपरनई, पोखरी (घाट), बेलगाव फुकेवाडी, सोमनाथवाडी आदी परिसरातील शेतशिवारात वराहांनी धुमाकूळ घातला असून वराहाच्या झुंडीच्या झुंडी उभ्या पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

शेतातील सोयाबीन, भुईमूग आदी उगवलेल्या पिकांची नासाडी जास्त होत आहे. रंगीबेरंगी साड्यांना घाबरून वन्यप्राणी शेताकडे फिरकत नाहीत म्हणून पिकांभोवती साड्यांचे कुंपण करण्यात येत आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मनुष्यहानी तसेच पाळीव प्राणी दगावल्यास देण्यात येणाऱ्या मदत निधीत राज्य शासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये वाढ केली आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कोणीही मृत झाल्यास २० लाख रुपये दिले जातात. त्यात धनादेशाद्वारे तत्काळ १० लाख रुपये व उर्वरित १० लाख रुपये बॅंकेत फिक्स डिपॉझिट केले जातात. तसेच अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये, जखमी झाल्यास १ लाख २५ हजार, किरकोळ जखमीस २० हजार रुपये तसेच पाळीव प्राणी दगावल्यास बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ७० हजार रुपये दिले जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT