Palkhi Prasthan
Palkhi Prasthan Agrowon
ताज्या बातम्या

Sopandeo Palkhi Prasthan : संत सोपानदेव पालखीचे १५ जूनला सासवड येथून प्रस्थान

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Pune News: संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज (Sopandeo Palkhi Prasthan ) पालखी सोहळ्याचे सासवडमधून १५ जूनला सकाळी ११ वाजता सोपानदेव मंदिरातून प्रस्थान होणार आहे, अशी माहिती पालखीसोहळा प्रमुख ॲड. त्रिगुण गोसावी यांनी दिली.

गुरुवारी (ता. १५ जून) सकाळी ११ वाजता संत सोपानदेव मंदिराच्या देऊळवाड्यातून पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ येईल. त्यानंतर दुपारचा विसावा पिंपळे तर, पांगारेतील निष्णाईदेवी मंदिरात रात्रीचा मुक्काम होईल.

१६ जूनला यादववाडीत सकाळचा विसावा होऊन परिंचेत दुपारचा नैवेद्य तर, मांडकीत रात्रीचा मुक्काम होईल.

१७ जूनला सकाळचा विसावा जेऊर, पिंपरे खुर्दमधून नीरेत दुपारचा नैवेद्य तर बारामतीतील निंबुतमध्ये रात्रीचा मुक्काम होईल. १८ जूनला निंबुत छपरी, वाघळवाडीमार्गे सोमेश्वरनगरमध्ये पहिले गोल रिंगण होऊन मुक्काम होईल.

१९ जूनला करंजेपूलमध्ये सकाळचा विसावा तर १० फाटामध्ये दुपारचा नैवेद्य, वडगाव निंबाळकरमध्ये दुपारचा विसावा होऊन कोहळे बुद्रुकमध्ये मुक्काम होईल.

२० जूनला कठीणपूलमध्ये सकाळचा विसावा तर पणदरेत दुपारचा नैवेद्य, माळेगावमध्ये संध्याकाळी दुसरे गोल रिंगण होऊन मुक्काम होईल. २१ जूनला कोकाटे महाराज वस्तीत दुपारचा विसावा होऊन बारामतीत मुक्काम होईल.

२२ जूनला मोतीबागमध्ये सकाळचा विसावा, तर पिंपळीत पहिले बकरी रिंगण होईल. भवानीनगर, सणसर, बेलवाडी फाटामध्ये दुपारचा विसावा होऊन लासुर्णेत मुक्काम होईल.

२३ जूनला लालपुरीत सकाळचा विसावा, कळंबमध्ये दुपारचा नैवेद्य, तर निमसाखरमध्ये दुपारचा विसावा होऊन रात्री निरवांगीत मुक्काम होईल.


२४ जूनला रेडणीत सकाळचा विसावा, दुपारचा नैवेद्य लाखेवाडीत तर नीरनिमगाव चौकात दुपारचा विसावा होऊन अकलूजमध्ये मुक्काम होईल. २५ जूनला बाबीर पूल, महाळुगमध्ये सकाळचा विसावा, श्रीपूरमध्ये दुपारचा नैवेद्य तर माळखांबीत दुपारचा विसावा होऊन बोंडलेत मुक्काम होईल.

२६ जूनला बोंडलेत संत सोपानदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज बंधू भेट सोहळा होईल. तर, भंडीशेगावमध्ये मुक्काम होईल. २७ जूनला दुपारी वाखरीत उभे रिंगण आणि पालख्यांच्या भेटीचा सोहळा तसेच पालखीचा मुक्काम होईल.

बुधवारी २८ जूनला पालख्यांचे वाखरी पादुकाजवळ उभे रिंगण होऊन पंढरपूरमध्ये आगमन होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT