Sangli Umadi Police agrowon
ताज्या बातम्या

Sangli Umadi Police : पोलिसांनी जनावरांचा ट्रक अडवला अन्, शेळ्या मेंढ्यांचा गुदमरून मृत्यू

Sangli Animal Market : माडग्याळ येथे भरणाऱ्या बाजारात मिरज, सांगली, इस्लामपूर, कर्नाटकातील बंगळूर तसेच तामिळनाडू येथील व्यापारी शेळ्या, मेंढ्या खरेदीसाठी येतात.

Team Agrowon

Sangli Jat News : सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील माडग्याळ गावात शेळ्या- मेंढ्याचा मोठा बाजार भरतो. या बाजारात मिरज, सांगली, इस्लामपूर, कर्नाटकातील बंगळूर तसेच तामिळनाडू येथील व्यापारी शेळ्या, मेंढ्या खरेदीसाठी येतात. दरम्यान परराज्यात जाणाऱ्या जनावरांच्या ट्रकला पोलिसांनी अडवल्याने काही शेळ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या दोन दिवसांपूर्वी जत तालुक्याची कर्नाटक संलग्न असल्याने कर्नाटकातील बंगळूर तसेच तामिळनाडू येथील व्यापारी नेहमीप्रमाणे जनावरे खरेदीसाठी येतात. त्यांनी पाच ते सात मोठ्या वाहन्यामध्ये एक हजार पेक्षा जास्त जनावरे खरेदी करून वाहनांत भरली.

अचानक जनावरांच्या बाजारात पोलिसांनी वाहने अडवली. यामुळे ट्रकमध्ये अडकेली जनावरे गुदमरली यातून दोन जनावरांचा मृत्यू झाला. पोलीसांनी तशीच वाहने उमदी पोलीस ठाण्यात आणत चौकशी म्हणून दिर्घकाळ वेठीस धरले.

याबाबत जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना याचा जाब विचारला त्यानंतर वाहने सोडण्यात आली. बाजारात विनाकारण व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, अशा सूचनाही सावंत यांनी दिल्या.

याबाबत जत बाजार समितीच्या सभापती शकुंतला बिराजदार यांनी दिलेल्या माहितीसाठी, किरकोळ कारणासाठी पोलिसांनी व्यापारी व वाहनधारकांना त्रास देऊ नये. त्यामुळे बाजार बंद होण्याची शक्यता आहे. बाजारावर याचा परिणाम झाल्यास याला पोलिस जबाबदार असतील. बाजाराचे नुकसान न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जत बाजार समितीचे सहाय्यक सचिव सोमनिंग चौधरी म्हणाले, बाहेरील व्यापारी आल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. विनाकारण त्रास झाल्यास व्यापारी बाजारात येणार नाहीत. बाजाराचे नुकसान होईल. शेतकरी जेटलिंग कोरे म्हणाले, तामिळनाडू व कर्नाटकातील व्यापारी आल्याने आमच्या जनावरांना चांगला भाव मिळतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dr. Homi Cherian: सेंद्रिय मसाला पीक उत्पादनाला प्रोत्साहन

Fake Success Story: फसव्या यशकथांचा सापळा

Tur Crop Disease: तुरीवरील वांझ रोगास कारणीभूत कोळीचे नियंत्रण

Vermicompost Production: गांडूळ खत निर्मितीतून आर्थिक स्वावलंबन

Agriculture Scheme: ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना १.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान; लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

SCROLL FOR NEXT