Bailgada Sharyat Agrowon
ताज्या बातम्या

Bailgada Sharyat : नाधवडेतील स्पर्धेत संगमेश्वरची बैलगाडी ठरली सरस

बंड्या मांजरेकर मित्रमंडळाच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी नाधवडे महादेव मंदिरानजीकच्या माळरानावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Sindhudurg News ः जिल्ह्यातील नाधवडे (ता. वैभववाडी) येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीत (Bailgada Sharyat) संगमेश्वर येथील सूरज सुरेश चव्हाण यांच्या बैलगाडीने प्रथम तर कोल्हापूर शाहूवाडी येथील श्रावणी सचिन सावंत यांच्या गाडीने द्वितीय क्रमांक मिळविला.

बंड्या मांजरेकर मित्रमंडळाच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी नाधवडे महादेव मंदिरानजीकच्या माळरानावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीचे उद्‌घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले.

या वेळी माजी आमदार प्रमोद जठार, सुधीर नकाशे, अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, बाप्पी मांजरेकर आदी उपस्थित होते. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह अन्य भागांतील तब्बल ५५ बैलगाड्या शर्यतीत सहभागी झाल्या होत्या.

यामध्ये संगमेश्वर कडवई येथील सूरज चव्हाण यांनी १ मिनिट १६ सेकंदांत आपली गाडी पळवली. श्रावणी सावंत यांनी १ मिनिट २२.५३ सेकंद (द्वितीय), कासार्डे येथील संजय जंगम यांनी १ मिनिट २२.७५ सेकंद (तृतीय), करण बेटकर (रत्नागिरी) १ मिनिट २३.४० सेकंद (चतुर्थ), गजानन मधूकर कुंभार (सावर्डे शाहूवाडी) १ मिनिट २४.७५ सेकंद या वेळेत गाडी पळवली.

प्रथम क्रमांकास ३५ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास २५ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकास १० हजार रुपये व चषक आणि पाचव्या क्रमांकास ५ हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले.

त्याचप्रमाणे उत्कृष्ट चालक म्हणून बबन दोरे यांना २ हजार रुपये, उत्कृष्ट बैल जोडी म्हणून प्रतिक मेस्त्री यांच्या बैलगाडीला २ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भेट दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत ३.५५ लाख शेतकरी

Sugarcane Workers Safety: ऊस तोडणी कामगारांबाबत हलगर्जीपणा केल्यास कारवाई

Cow Slaughter Ban Law: गोपालक शेतकरी, व्यापाऱ्यांना संरक्षण द्या; अन्यथा गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा

Flowers Farmer Struggles: शेवंती उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

National Cooperative Sugar Mill Awards: दत्त शिरोळ, क्रांती अग्रणी कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार

SCROLL FOR NEXT