Salokha Yojana Agrowon
ताज्या बातम्या

Salokha Yojana : शेतजमिनींच्या ताब्यासाठी ‘सलोखा योजना’

तुकडेबंदीतील त्रुटींवर सरकारचा उतारा

Team Agrowon

मुंबई : शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील वाद मिटविण्यासाठी सलोखा योजना (Salokha Yojana ) राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पहिल्या शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे, दुसऱ्या शेतकऱ्याचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.

चुकीच्या नोंदी, मालकी हक्कांचे वाद, शासकीय योजनांतील त्रुटी, किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी कारणांमुळे शेतजमिनींचे वाद मोठ्या प्रमाणात आहेत. शेतजमिनींचे वाद क्लिष्ट स्वरूपात असल्याने ते वर्षानुवर्षे प्रलंबितही आहेत. हे वाद संपुष्टात यावेत, यासाठी सलोखा योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

या योजनेअंतर्गत मोठ्या गट नंबरातील वाटप होऊन अनेक पोटहिस्से झालेले असतात. परंतु पोटहिस्सा झालेला नसतो. अशा वेळी प्रत्यक्ष स्थळपाहणी करूनच पंचनामा करण्यात येणार आहे. त्या वेळी शेजारचा वहिवाटदार असलेल्या दोन सज्ञान खातेदारांची पंचनामा नोंदवहीवर सही आवश्यक आहे. तलाठी आणि गावस्तरावर सलोखा योजनांसाठी आवश्यक त्या नमुन्यात नोंद करणे गरजेचे आहे. राज्यात सध्या कार्यान्वित एकत्रीकरण व तुकडेबंदी योजना राबविताना काही प्रकरणांत चुका झाल्या आहेत. त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सक्षम अधिकारी नेमण्याचा अभिप्राय वित्त विभागाने केला होता. शासन यंत्रणेकडून झालेल्या चुकांमुळे जमिनीचा ताबा परस्परविरोधी शेतकऱ्यांकडे राहिला आहे. अशा शेतकऱ्यांना त्या त्या जमिनीचा ताबा देण्यासाठी अदलाबदल दस्तासाठी एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि १०० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येईल.

दोन वर्षांसाठी योजना

अदलाबदल दस्तासाठी नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्कांमध्ये सवलत देण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून दोन वर्षांची मुदत असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी परस्परविरोधी शेतकऱ्यांकडे जमिनींचा ताबा १२ वर्षांपासून असावा, अशी अट घालण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Levels Drop: आठवडाभरात लघू प्रकल्पांत दोन टक्के, मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

Farm Road Issue: करमाळ्यातील शेतकऱ्यांचे बंद रस्ते तत्काळ मोकळे करा : नारायण पाटील

Agriculture Irrigation Management: सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी आराखडा तयार करा

Cotton Rate: उद्योगांचा नफा कमी झाल्याने आयात शुल्क काढण्याची मागणी

Crop Damage Compensation: पावसाच्या नुकसानीपोटी ५.४० कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT