Falbag Yojana : फळबाग लागवड योजना सुरू

Team Agrowon

महाविकास आघाडी सरकारने बंद केलेली स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb Phundkar Orchard Cultivation Scheme) एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा सुरू केली आहे.

Falbag Yojana | Agrowon

२०२२-२३ या वर्षात इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

Falbag Yojana | Agrowon

या योजनेकरिता किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर क्षेत्र अनुज्ञेय आहे. कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थ्यांच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपीक लागवड करता येईल.

Falbag Yojana | Agrowon

Falbag Yojana या योजनेअंतर्गत पुढील बहुवार्षिक फळपिकांचा आंबा, पेरू, डाळिंब, लिंबू, मोसंबी, संत्रा, सीताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, अंजीर व चिकू यांचा समावेश करण्यात आला आहे.

Falbag Yojana | Agrowon

मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजनेतून अपात्र असणारे शेतकरी यांना वैयक्तिक लाभ घेता येईल. शेतकऱ्यांच्या स्वत:च्या नावे सातबारा व आठ अ चा उतारा असणे आवश्यक आहे.

Falbag Yojana | Agrowon

इच्छुक शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर नोंदणी करावी.

Falbag Yojana | Agrowon

या योजनेतंर्गत अनुदान मंजूर मापदंडाप्रमाणे देय असल्यामुळे अर्ज करताना शेतकऱ्यांनी सातबारा व आठ अ नुसार क्षेत्र सर्व्हे नंबर फळपिकांचे नाव, प्रकार, कलमे, रोपे, लागवड अंतराचे परिणाम (मीटरमध्ये) इत्यादी माहिती शेतकऱ्यांनी अचूक भरावी.

Falbag Yojana | Agrowon
cta image | Agrowon