soybean market
soybean market agrowon
ताज्या बातम्या

Soybean Market : बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्रीसाठी झुंबड

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः सोयाबीनचा काढणी हंगाम (Soybean Harvesting Season) अंतिम टप्यात पोहोचला असून, दुसरीकडे सोयाबीन विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये एकच झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे. बहुतांश बाजार समित्यांमध्ये सुमारे पाच हजार पोत्यांपेक्षा अधिक आवक सुरू आहे. यामुळे मोजमापासह इतर व्यवस्थांवरही ताण पोहोचत आहे. एकाचवेळी एवढा शेतीमाल विक्रीला (Soybean Crop) येत असल्याने बाजार समिती प्रशासनाची तारांबळ उडत आहे.

या मोसमातील सोयाबीनची विक्री सर्वत्र वाढली आहे. उत्पादकता विविध भागांत वेगवेगळी आहे. सरासरी पाच ते सात क्विंटलदरम्यान अनेकांना उत्पादन झालेले आहे. काही शेतकऱ्यांना १० ते १२ क्विंटलपर्यंतसुद्धा एकरी उत्पादन झालेले आहे. आता बाजार समित्यात सोयाबीन विक्रीवर जोर आहे. मध्यंतरी शासनाने सोयाबीनची स्टॉक लिमिट कमी केल्याचा फायदा बाजारभावांमध्ये दिसत आहे. सोयाबीनचा कमाल दर ५००० ते ५५०० दरम्यान आहे. तर वाशीमसारख्या बाजार समितीत उच्चतम दर्जाचे केडीएस सोयाबीन ६१०० ते ७००० रुपयांदरम्यान विक्री होत आहे.
येत्या काळात सोयाबीनचा दर आणखी वाढेल या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केलेली नाही. सध्या आवक होत असलेल्या सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त आढळत असल्याने सरासरी दर कमी राहत आहे. कमी आर्द्रता असलेल्या व दर्जेदार सोयाबीनला अधिकाधिक दर देण्यासाठी खरेदीदारांमध्ये चुरस होत आहे.

शेगाव तालुका व इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल फक्त बाजार समिती आवारातच विक्रीस आणून बाजार समितीच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती शेषराव पाटील, उपसभापती पुंडलिक भिवटे, सचिव विलास पुंडकर व संचालक मंडळाने केले आहे.

बाजार समित्यांमधील दर
अकोला बाजार समिती
आवक - ७६४३
भाव - ४२०० ते ५१५०
मलकापूर
आवक- १४४६
भाव -४२५० ते ५२५०
वाशीम
आवक- १६५७६

भाव -४६५० ते ५६००


बाजार समितीची बक्षीस योजना
सध्याच्या हंगामात शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल थेट बाजार समितीत विक्रीला आणण्यासाठी प्रोत्साहन म्हणून शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक नोव्हेंबरपासून प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार दर मंगळवारी बाजार आवारात सर्वासमक्ष शेतीमाल विक्री केलेल्या शेतकऱ्यांपैकी ३ शेतकऱ्यांचा ड्रॉ काढण्यात येईल. विजेत्यांना बाजार समितीतर्फे प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून भेटवस्तू देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासाठी बाजार आवारात शेतीमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांनी समितीच्या आवक गेटवर नावाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. विजेत्या शेतकऱ्यांना फवारणी पंप, गॅस शेगडी, मिक्सर, कुकर, सीलिंग फॅन, टेबल फॅन आदी वस्तू दिल्या जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT