Sadabhau Khot
Sadabhau Khot  Agrowon
ताज्या बातम्या

Sadabhau Khot : ‘आरटीओ’च्या दारात हळद ओतली

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः वसंतदादा मार्केट यार्डमध्ये (Vasantdada Market yard) हळद विकण्यासाठी आलेल्या राहुरी येथील शेतकऱ्याच्या वाहनाला तब्बल ३० हजार रुपये दंड केल्याने संतापलेले माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी बुधवारी (ता. १२) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर हळद ओतली.

इथेच हळदीचा लिलाव काढा आणि तुमचा दंड भरून घ्या, असे उघड आव्हान त्यांनी दिले.

हळद घेऊन आलेल्या टेम्पोची कागदपत्रे अपुरी होती आणि त्यात क्षमतेपेक्षा अधिक माल भरला होता, असे कारण सांगत पेठ (ता. वाळवा) येथे वाहन थांबवून कारवाई झाली होती. सावळी (ता. मिरज) येथे आरटीओ कार्यालयासमोर रयत क्रांतीने आंदोलन केले. ‘

शेतकऱ्यांचे राज्य आहे म्हणून सांगता आणि शेतकऱ्यांचे खळे लुटता’, अशा शब्दांत श्री. खोत यांनी सरकारला घरचा आहेर दिला.

श्री. खोत यांनी आरोप केला, की राहुरी (जि. नगर) येथील शिवाजीराव यादवराव वने टेम्पोतून सुमारे अडीच टन हळद घेऊन वसंतदादा मार्केट यार्डकडे येत होते.

पेठ नाका येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने गाडी अडवली. त्यात क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्याने ती जप्त केली. शेतकरी वने हे सत्तर वर्षांचे आहेत. त्यांना तेथेच उतरवले.

अधिकारी गाडीत बसून गाडी घेऊन गेले. शेतकरी वने रिक्षाने वजन काटे फिरत बसले. त्यांना ते इस्लामपुरात कुठल्या काट्यावर गेलेत लवकर सापडेना. एके ठिकाणी पत्ता मिळाला, पण गाडी सांगलीला गेल्याचे सांगण्यात आले. ते रिक्षाने सांगलीला आले. त्यासाठी सातशे रुपये खर्च झाले.

चालकाचा मोबाईल पोलिसांनी काढून घेतला होता. त्यामुळे त्याचा लवकर थांगपत्ता लागना. सांगली आल्यावर तीस हजार दंड भरून गाडी न्या, असे सांगण्यात आले. वने यांनी माझा यांचा नंबर मिळवला आणि झाला प्रकार सांगून आता आत्महत्याच करायला हवी, असा संताप व्यक्त केला.


लालासाहेब पाटील, लालासाहेब धुमाळ, विनायक जाधव, बजरंग भोसले, पांडुरंग बसुगडे, महेश माने, राकेश भोसले, शिवतेज खोत, संदीप खोत आदी सहभागी होते.


शेतकऱ्यांची बोली
सदाभाऊ खोत यांनी हळदीचे पोती खाली ओतली आणि आरोपांच्या फैरी सुरू केल्या. आरटीओ कार्यालयात आलेले शेतकरी जमा झाले.

त्यांनी हळदीवर आम्ही बोली लावतो म्हणून शंभर, दोनशे, पाचशे रुपयांच्या नोटा पोत्यावर ठेवल्या. हे घ्या पैसे आणि दंड फेडून घ्या, असे आव्हान देत शेतकरीही आक्रमक झाले.

४२ लाख टार्गेट
सदाभाऊ खोत आक्रमक झाल्याने काही अधिकाऱ्यांनी दंड वसुलीचे टार्गेट महिन्याला ४२ लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यावर सदाभाऊंनी संताप व्यक्त करत, ‘त्यापैकी शेतकऱ्यांकडून किती वसूल करायचे टार्गेट आहे’, असा सवाल विचारला. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले.


कायदेशीर त्रुटी असतील तर कारवाई करावीच लागते. या प्रकरणात आम्ही दंड कमी करू, मात्र जो काही नियमाने आहे तो दंड बसेल. विनाकारण कोणाला त्रास देण्याची आमची भूमिका नाही.
- विनोद सगरे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT