Sugarcane  Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane : उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव

तापी व गिरणा परिसरातील चोपडा, यावल, भडगाव, चाळीसगाव तालुक्यांत काही भागांत लागवड झालेल्या उसावर ‘तांबेरा’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

टीम ॲग्रोवन

मेहुणबारे, जि.जळगाव ः तापी व गिरणा परिसरातील चोपडा, यावल, भडगाव, चाळीसगाव तालुक्यांत काही भागांत लागवड झालेल्या उसावर ‘तांबेरा’ रोगाचा प्रादुर्भाव (Rust Disease Outbreak On Sugarcane) झाला आहे. ज्यामुळे उसाची पाने (Sugarcane Leaf) तपकिरी रंगाची होत आहे. सुरुवातीला एक, दोन शेतांमध्ये असे चित्र दिसत होते. मात्र, आठ- दहा दिवसांपासून चाळीसगाव व भडगाव तालुक्यातही शेतांमध्ये लागवड झालेल्या उसावर या रोगाचा फैलाव होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

या भागात ऊस व केळीची चांगली लागवड झाली आहे. सध्या गिरणा परिसरात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नसल्याने उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात पाच हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. यापैकी दोन हजार हेक्टर उसावर या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. मागीलवर्षी कपाशीवर पडलेल्या बोंड अळीच्या संकटातून शेतकरी बाहेर पडत नाही, तोच पुन्हा उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. उसाची हिरवी पानेही चिकट व तपकिरी रंगाची होत आहेत. त्यातच उसाची पाने करपण्याची लक्षणे उसावर दिसत आहे.

आता या रोगाचा फैलाव होण्यास सुरवात झाली आहे. वरखेडे भागातही या रोगाने डोके वर काढले आहे. बहुतांश शेतकरी उसाचे दुबार पीक खोडवा म्हणून राखून ठेवतात. त्यावर बऱ्यापैकी खर्च झालेला असतो. तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी महागडी औषधी घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र, काहीएक फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती पाहता, कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. या भागातील नदीकाठावरील तसेच डोंगराशेजारील शेतांमध्ये तांबेराचे प्रमाण अधिक आहे.

कपाशीचे पीक घेतले तर बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि उसाचे पीक घेतले तर त्यावर पडणारा तांबेरा रोग यामुळे पीक नेमके कोणते घ्यावे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. रोगामुळे या भागातील शेतांमधील उसाचे प्लॉट खराब होत आहे.

कार्यशाळेचे आयोजन करावे...

तापी व गिरणा परिसरांतील बहुतांश ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी तसेच विविध विकास सोसायटी, बँकेकडून कर्ज घेतले आहे. शेतकऱ्यांना ऊस, मका, कपाशी पिकांबाबत लवकरच र्मार्गदर्शन करून कार्यशाळा घेण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे एस.बी.पाटील व इतर शेतकऱ्यांकडून होत आहे. संबंधित साखर कारखाना, तहसीलदार व जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Project: आनंदवाडी प्रकल्पाच्या सिंचनक्षेत्रात १०३ हेक्टरने वाढ

Veterinary Services: पशुवैद्यक हे अन्न, आरोग्याचे रक्षक

Fertilizer Dealers Protest: नाशिकमध्ये कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा कडकडीत बेमुदत बंद

Natural Farming Training: नैसर्गिक शेतीसाठी शेतकरी शाळांचा प्रभावी उपक्रम

Groundwater Recharge: विहिरींचे पुनर्भरण काळाजी गरज! कसे करावे पुनर्भरण?

SCROLL FOR NEXT