Dams  Agrowon
ताज्या बातम्या

बंधाऱ्यांसाठी नगर जिल्ह्याला दोनशे कोटी

जलसंधारण विभागाद्वारे ही कामे केली जातील. लघुपाटबंधारे विभागाच्या ८६८ पैकी ६९८ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

Team Agrowon

अहमदनगर : जिल्ह्यातील जुन्या सर्व बंधाऱ्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन, सर्व तेरा तालुक्यांतील जुन्या एक हजार ४२ बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे जुने ६९८ बंधारे आहेत. जलसंधारण विभागाचे ३४४ बंधारे आहेत. नगर तालुक्यातील शंभर बंधाऱ्यांसाठी चौदा कोटी, कर्जतमधील ३१ बंधाऱ्यांसाठी सात कोटी, कोपरगावातील ४९ बंधाऱ्यांसाठी सात कोटी, जामखेडमधील ४६ बंधाऱ्यांसाठी सात कोटी, नेवाशातील ७२ बंधाऱ्यांसाठी सात कोटी, पाथर्डीतील ७३ बंधाऱ्यांसाठी नऊ कोटी, पारनेरच्या १६५ बंधाऱ्यांसाठी ३३ कोटी, राहत्यातील २९ बंधाऱ्यांसाठी चार कोटी, राहुरीतील २१ बंधाऱ्यांसाठी दोन कोटी, श्रीगोंद्यातील ११८ बंधाऱ्यांसाठी २८ कोटी, संगमनेरमधील १६९ बंधाऱ्यांसाठी ३३ कोटी, शेवगावमधील ९९ बंधाऱ्यांसाठी १५ कोटी, श्रीरामपूरमधील २१ बंधाऱ्यांसाठी चार कोटी, असे सुमारे २०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

जलसंधारण विभागाद्वारे ही कामे केली जातील. लघुपाटबंधारे विभागाच्या ८६८ पैकी ६९८ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याची अंदाजपत्रकीय किंमत ११४ कोटी आहे, असे सांगण्यात आले. बंधाऱ्याच्या दुरुस्तीमुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. त्याचा शेतीला मोठा फायदा होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT