NSS Agrowon
ताज्या बातम्या

NSS : राष्ट्र उभारणीत विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची : देशमुख

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराद्वारे विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळतो. विद्यार्थ्यांनी या शिबिरातून प्रेरणा घेऊन राष्ट्र उभारणीसाठी अधिक प्रखरपणे काम करावे.

टीम ॲग्रोवन

वाशीम ः राष्ट्रीय सेवा योजना (National Service Scheme) शिबिराद्वारे विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळतो. विद्यार्थ्यांनी या शिबिरातून प्रेरणा घेऊन राष्ट्र उभारणीसाठी अधिक प्रखरपणे काम करावे. राष्ट्र उभारणीत विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत रिसोड येथील कृषी महाविद्यालयाचे (Agriculture College) विश्‍वस्त चैतन्य देशमुख यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित रिसोडच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर १० ते १६ डिसेंबर या कालावधीत सवड येथे घेण्यात आले. या शिबिराचे उद्‍घाटन श्री. देशमुख यांच्या हस्ते झाले.

या वेळी प्रगतिशील शेतकरी गजाननराव लाटे, पीएसआय श्री. गवई, इंडियन बँक शाखा व्यवस्थापक श्री. माने, उपसरपंच दशरथ मोरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संतोष सपकाळ तसेच प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते. या शिबिरामध्ये योगासने, ग्रामप्रभात फेरीद्वारे मतदार नोंदणी जागृती, श्रमदान, विविध कृषी तंत्रप्रसाराचे कार्यक्रम व प्रात्यक्षिके तसेच विविध संसाधन तज्ज्ञ व्यक्तींनी तांत्रिक सत्रांमध्ये मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची सांगता शुक्रवारी (ता.१६) सुविदे फाउंडेशनचे विश्‍वस्त संजय उकळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. श्री. उकळकर यांनी शिबिरात राबविलेल्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. या संपूर्ण शिबिरामध्ये कृषी महाविद्यालयातील एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष आपतुरकर व तांत्रिक समन्वयक राजेश डवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी प्रा. डी. डी. मसुडकर, प्रा. सुनील जाधव, प्रा. राजन सरनाईक, प्रा. मनोज जाधव, अजय जाधव, संदीप देशमुख, श्रीमती बाळे, दीपक गायकवाड, अन्वरभाई यांच्यासह कृषी महाविद्यालयाच्या चमूने योगदान दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT