sugarcane Rate agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Rate : ऊस दरासाठी पंढरपूर, माढा,माळशिरसमध्ये ‘रास्ता रोको

उसाला पहिली उचल २५०० रुपये देण्याच्या मागणी

Team Agrowon

सोलापूर ः उसाला पहिली उचल (sugarcane FRP) २५०० रुपये देण्याच्या मागणीवर ऊसदर संघर्ष समिती अद्यापही ठाम आहे. त्यातही जिल्हाधिकाऱ्यांकडील बैठक फिस्कटल्यानंतर संघर्ष समितीने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे.

गुरुवारी (ता.३) जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, माढा या तालुक्यांत प्रमुख मार्गावर रास्ता-रोको आंदोलन करत संघर्ष समितीने लक्ष वेधून घेतले. येत्या दोन दिवसांत यावर तोडगा काढा, अन्यथा कारखान्याच्या चेअरमनना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा संघर्ष समितीच्या नेत्यांनी दिला.

पंढरपूर ते कराड रस्त्यावर सोनंके येथे समितीने ‘रास्ता रोको’ करत वाहतूक रोखली. दीपक भोसले, माउली हळणवर, माऊली जवळेकर आदी यामध्ये सहभागी झाले. माळशिरसमधील निमगाव पाटी येथे पुणे- पंढरपूर मार्गावरही ‘रास्ता रोको’ झाले.

‘स्वाभिमानी’चे तालुकाध्यक्ष अजित बोरकर, कमलाकर माने देशमुख, साहिल अत्तार आदींनी कारखानदारांविरोधात घोषणा दिल्या. माढ्यातील बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर रिधोरे, तांदूळवाडी, म्हैसगाव येथे ‘रास्ता रोको’ झाले.

सिद्धेश्वर घुगे, शिवाजी पाटील, शांतिलाल गवळी आदींसह शेतकरी सहभागी झाले. सर्वच शेतकरी संघटनांनी एकत्र येत ऊसदर संघर्ष समिती स्थापली आहे. त्यामुळे या आंदोलनाला बळ आले आहे.

...या आहेत प्रमुख मागण्या

उसाला पहिली उचल २५०० रुपये आणि अंतिम ऊसबिल ३१०० रुपये द्यावे.

उसाची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह अन्य वाहनांवर आरटीओने कारवाई करावी.

साखर कारखान्याकडील वजन काटे अॅानलाईन करावेत.

गोपीनाथ मुंडे विकास महामंडळामार्फत तोडणीदार, वाहतूकदार यांचे करार करावेत.

दहा ट्रॅक्टरचे टायर फोडले

एकीकडे ऊसदर संघर्ष समितीने जिल्ह्यात गुरुवारी (ता.३) ‘रास्ता रोको’चा इशारा दिला. त्यानुसार अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली. पण दुसरीकडे ट्रॅक्टरची टायर फोडण्याचे आंदोलन सुरूच राहिले. गुरुवारी (ता.३) सकाळी पंढरपूर- पुणे महामार्गावर भंडीशेगाव येथे ऊस वाहतूक करणाऱ्या दहा ट्रॅक्टर्सची टायर फोडण्यात आली. हा ऊस भाळवणीच्या वसंतराव काळे साखर कारखान्याकडे चालला होता, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब

Wildlife Crop Damage : पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शासन सकारात्मक

MahaDBT : ‘महाडीबीटी’ पोर्टलवर कागदपत्रे अपलोडसह अनेक अडचणी

Book Review: ध्यासपंथी वाटचालींचा कोलाज

Rural Development: शेतकरी, ग्रामीण विकास आणि पर्यावरणाचा एकत्र विचार व्हावा

SCROLL FOR NEXT