Tomato Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Production : कृषी आयुक्‍तांकडून नागपूरातील टोमॅटो लागवडीचा आढावा

Tomato Rate : कृषी आयुक्‍तांनी नागपूर विभागातील टोमॅटो लागवडीचा कृषी विद्यापीठ, संशोधन संचालक आणि कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

Team Agrowon

Nagpur News : राज्यात टोमॅटोचे दर अचानक वाढले. त्या पार्श्‍वभूमीवर कृषी आयुक्‍तांनी राज्यातील कृषी विद्यापीठ, संशोधन संचालक आणि कृषी अधिकाऱ्यांची पुण्यात नुकतीच बैठक घेतली. त्यानंतर टोमॅटो लागवड क्षेत्राबाबत विभागीय कृषी सहसंचालकांकडून माहिती घेण्यात आली. त्यानुसार नागपूर विभागात १५०० हेक्‍टरवर टोमॅटो लागवड असल्याबाबत कळविण्यात आले आहे. मात्र पावसाला विलंब झाल्याने नागपूर विभागात टोमॅटो लागवड लांबणीवर पडली आहे.

देशासह महाराष्ट्रातही टोमॅटोचे दर वाढीस लागले आहेत. काही भागात २०० तर काही भागात १५० रुपये किलोने टोमॅटोची विक्री होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने टोमॅटो दर नियंत्रणात आणण्यासाठीच्या उपाययोजना भर दिला आहे. त्याच प्रयत्नाअंतर्गत राज्यातील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक, कृषी विभागाचे अधिकारी यांची एक बैठक पुणे येथे कृषी आयुक्‍त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत टोमॅटो पिकाखालील खरीप २०२३ या हंगामातील क्षेत्र, उत्पादन विषयक माहिती तत्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राज्यात गेल्या डिसेंबर २०२२ ते मे २०२३ या दरम्यान टोमॅटोला बाजारात अतिशय अल्प दर मिळाल्याने (डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान ६ ते ९ रुपये, मार्च २०२३ दरम्यान ११ रुपये, व एप्रिल २०२३ ते मे २०२३ या काळात ८ ते ९ रुपये प्रती किलो) शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम नवीन लागवडीवर झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला. सध्या शेतकरी नव्याने टोमॅटो लागवड करीत आहेत. याबाबत येत्या काळात ५ ते ६ दिवसांत वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्याचा बाजार स्थिर; कापूस दर स्थिर, टोमॅटोमध्ये काहीसे चढ उतार, तर डाळिंब व केळीला चांगली मागणी कायम

Mhaisal Lift Irrigation : ‘म्हैसाळ’साठी सौरऊर्जा प्रकल्पाचा नव्या वर्षात प्रारंभ

Wildlife Crop Damage : शाहूवाडीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनासाठी प्रतीक्षा कायम

Monsoon Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर

SCROLL FOR NEXT