Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पावसाच्या पुनरागमनामुळे दिलासा

Latest Rain Update : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ८) सकाळी दहापर्यंतच्या २४ तासांमध्ये ८२ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ८) सकाळी दहापर्यंतच्या २४ तासांमध्ये ८२ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील दिग्रस कऱ्हाळे ८२.८ मिलिमीटर, नांदापूर ६७, येळेगाव ८८.८, साखरा ८४.८, हत्ता ९१.३ मिलिमीटर या ५ मंडलांत अतिवृष्टी झाली.

गेल्या २४ तासांत परभणी जिल्ह्यात सरासरी १८.२ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी ३६ मिलिमीटर पाऊस झाला. अनेक दिवसांच्या खंडानंतर पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हलक्या जमिनीवरील करपून गेलेल्या पिकांना या पावसाचा फायदा नाही. परंतु मध्यम, भारी जमिनीवरील पिकांपासून थोडे हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या आशा परत एकदा पल्लवित झाल्या आहेत.

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील ५२ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. अनेक भागांत शुक्रवारी (ता. ८) सकाळी काही वेळ चांगला पाऊस झाला. अनेक भागांत दुपारपर्यंत अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू होता. परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पालम तालुक्यांतील काही मंडलांत पावसाचा जोर होता.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १८.२ मिलिमीटर, तर सप्टेंबर महिन्यात आजवर एकूण सरासरी ३४.८ मिलिमीटर (७७.२ टक्के) पाऊस झाला. यंदा १ जून पासून आजवर एकूण सरासरी ३७३.६ मिलिमीटर (५८.६ टक्के) पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांतील ३० मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांतील ५ मंडलांत अतिवृष्टी झाली.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ३६ मिलिमीटर, तर सप्टेंबर महिन्यात आजवर एकूण सरासरी ५३.३ मिलिमीटर (१२९.१ टक्के) पाऊस झाला. यंदा १ जूनपासून आजवर आजवर एकूण सरासरी ५६१.३ मिलिमीटर (८२.३ टक्के) पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस स्थिती (५ मिलिमीटरच्या पुढे)

परभणी जिल्हा ः परभणी २३.८, परभणी ग्रामीण १२.३, पेडगाव २९.३, जांब १७, झरी ११.३, सिंगणापूर १३, दैठणा ८.५, पिंगळी १३, टाकळी कुंभकर्ण ८, जिंतूर १८.३, सावंगी म्हाळसा ५१.५, बामणी ३३.५, बोरी १६, आडगाव २९.८, चारठाणा २२.८, वाघी धानोरा २४, दूधगाव ११.५, सेलू १४.५, देऊळगाव गात १८, वालूर १७, कुपटा ८.५, चिकलठाणा २२.८, मोरेगाव २८.८, मानवत ७.८, केकरजवळा १२.५, कोल्हा १७.८, ताडबोरगाव १७.८, रामपुरी १६.३, पाथरी ६.५, बाभळगाव २३.८, हादगाव ११,

कासापुरी १४, सोनपेठ १५.५, आवलगाव २५, शेळगाव १२.८, वडगाव २७.८, गंगाखेड ३७.३, महातपुरी २५.८, माखणी २२, राणी सावरगाव २५.५, पिंपळदरी ११.५, पालम २२, चाटोरी ३१, बनवस ३०.३, पेठशिवणी १४.८, रावराजूर १३, पूर्णा ८.३, ताडकळस ८.३, लिमला ८.५, कात्नेश्‍वर ९.३, चुडावा ८.८, कावलगाव ५.३.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली ४०.३, नरसी नामदेव ३४.३, सिरसम १५.५, बासंबा २८, माळहिवरा १८.५, खंबाळा २९.५, कळमनुरी ३७.३, वाकोडी २९, आखाडा बाळापूर ३०.८, डोंगरकडा १४, वारंगा १७, वसमत १२.२, आंबा ३७.३, हयातनगर १२.५, गिरगाव २४.८, हट्टा १३.५, टेंभुर्णी १९, कुरुंदा १३.३, औंढा नागनाथ ३२, साळणा ३२, जवळाबाजार ३२, सेनगाव ५०.८, गोरेगाव २०, आजेगाव २०, पानकनेरगाव ५९.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT