Exportable Orchard  Agrowon
ताज्या बातम्या

Exportable Orchard : निर्यातक्षम फळबागांची नोंदणी करा ः डाबरे

जिल्ह्याचा समावेश ग्रेपनेट, मँगोनेट, अनारनेट, ऑरेंज नेट, ऑदरनेट, व्हेजनेट व बीटलनेट अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षात करण्यात आलेला आहे.

Team Agrowon

बुलडाणा : जिल्ह्याचा समावेश ग्रेपनेट (Grapenet), मँगोनेट (Mangonet), अनारनेट, ऑरेंज नेट, ऑदरनेट, व्हेजनेट व बीटलनेट अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षात करण्यात आलेला आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी (Oniline Registration) करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एन. डाबरे यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये आंबा, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, लिंबू, केळी व भाजीपाला या फळपिकांची लागवड आहे. या कार्यक्रमांतर्गत आंबा, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, लिंबू, केळी व भाजीपाला बागांची तपासणी करून नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून देण्यात येणार आहे. तसेच हळद लागवड क्षेत्राची नोंदणीसुद्धा व्हेजनेटअंतर्गत करण्यात येणार आहे. निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्याचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ताजी फळे निर्यातीत भारत आघाडीवर आहे.

युरोपियन युनियनला व इतर देशांना निर्यातीकरिता प्रामुख्याने कीडनाशक उर्वरित अंश व कीडरोगमुक्त उत्पादनाची हमी देणे आवश्यक असल्यामुळे अपेडा व कृषी विभागाच्या समन्वयाने राज्यात रेसिड्यू मॉनिटरिंग प्लॅनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामध्ये निर्यातक्षम बागांची नोंदणी, त्याची तपासणी, तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे इत्यादी कामे करण्यात येत आहेत.

निर्यातक्षम फळबागेच्या नोंदणीमध्ये ग्रेपनेटसाठी ऑक्टोबर ते जानेवारी २०२३, मँगोनेटसाठी डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ आणि अनारनेट, ऑरेंजनेट, ऑदरनेट, व्हेजनेट, बीटलनेटसाठी वर्षभर ऑनलाइन नोंदणी सुरू राहणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही श्री. डाबरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT