Sanjay Raut Agrowon
ताज्या बातम्या

मुख्यमंत्री विधानसभा बरखास्तीची शिफारस करणार?

सध्या राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने असल्याचं ट्वीट राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजीनामा देणार असल्याचे हे संकेत मानले जात आहेत.

Team Agrowon

सध्या राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने असल्याचं ट्वीट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजीनाम देतील आणि राज्यपालांना विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करतील, याचेच हे संकेत असल्याचे मानले जात आहे. ही शक्यता प्रत्यक्षात आल्यास राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. अर्थात सगळा निर्णय राज्यपालांच्या भुमिकेवर अवलंबून असेल.

विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा थंड पडण्यापूर्वीच महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जवळपास ३५ आमदारांसोबत बंड करत सेनेला आव्हान दिले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. बच्चू कडू, शंभूराज देसाई, संदीपान भुमरे यांच्यासारखे मंत्रीही या बंडात सहभागी झाले आहेत. सूरतमधून या सर्वांना पोलीस संरक्षणात आसामच्या गुवाहटीत नेण्यात आल्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीचे टेन्शन आणखी वाढले.

दरम्यान, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर आपल्या मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजीनामा देणार असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. दरम्यान, बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आपल्या मंत्रिपदाचा आणि शिवसेनेचा उल्लेख हटवलेला नाही, हे उल्लेखनीय आहे.

जास्तीत जास्त काय होईल? सरकार जाईल

बघू कोणाकडे किती आमदार आहेत, तुम्ही उगाच उतावळे होऊ नका, असा इशारा राऊत यांनी दिला. सध्या आमच्याकडे संख्याबळ आहे. हा आमच्या घरातला विषय आहे. एकनाथ शिंदे आणि अन्य सहकाऱ्यांसोबत माझं बोलणं चालू आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर कोणी नाराज आहे असं मला वाटत नाही. एकनाथ शिंदेंबरोबर सकाळीच चर्चा झाली. आमचा एक तास फोन कॉल झाला. काही समज गैरसमज असतात. पण चिंतेचे कारण नाही, असे राऊत यांनी सांगितले.

भाजपला सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांनी त्यांनी उतावीळ होऊ नये. यामुळे ठाकरे सरकार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असे वाटले तर राखेतून फिनिक्सप्रमाणे भरारी मारण्याचा आमचा इतिहास आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : सप्टेंबरमधील पीकनुकसानीपोटी ६४ कोटी ६१ लाख रुपये निधी वितरणास मंजुरी

Crop Damage : नांदेडमध्ये सप्टेंबरमध्ये ३२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Gokul Dudh Dar: 'गोकुळ'कडून म्हैस, गायीच्या दूध खरेदी दरात १ रुपयाने वाढ, पशुखाद्य दरात ५० रुपयांची कपात

Farmer Protest: अतिवृष्टी, अपुरी मदत आणि रखडलेली कर्जमाफीसाठी किसान सभेचे २२ ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन

Mango-Cashew Crop Damage : बागायतदार आर्थिक संकटात

SCROLL FOR NEXT