Raju Shetti Agrowon
ताज्या बातम्या

PM Kisan : नको म्हटलं, तरी पीएम किसान सन्मान निधी घ्याच.

योजनेत पात्र असूनही निधी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची चाललेली धडपड ही नक्कीच वेदनादायी असते. पण याचा नेमका उलट अनुभव माजी खासदार राजू शेट्टी यांना आला आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : योजनेत पात्र असूनही निधी (PM Kisan Scheme) मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची चाललेली धडपड ही नक्कीच वेदनादायी असते. पण याचा नेमका उलट अनुभव माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना आला आहे.

शेट्टी यांनी मला पीएम किसान सन्मान निधी नको, असे कळवूनही तब्बल ११ हप्ते त्यांच्या नावावर जमा झाले आहेत. एकीकडे पात्र लाभार्थ्यांना हा निधी मिळण्यास विलंब होत असताना लोकप्रतिनिधीलाच हा विचित्र अनुभव आला. यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

शेट्टी हे माजी संसदीय सदस्य असल्याने त्यांनी मला या निधीचा फायदा नको असे कळवले होते. नाव वगळण्याची मागणीही केली होती. पण प्रशासनाने याची दखल न घेता त्यांच्या नावावर लाभ देणे सुरूच ठेवले. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जाणारा दोन हजार रुपयांचा अकरावा हप्ता ३१ मे रोजी त्यांच्या खात्यात जमा झाला. लोकसभेचा माजी सदस्य असल्याने या योजनेसाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार अपात्र असूनही हा सन्मान निधी त्यांच्या खात्यावर जमा होत आहे.

याआधी त्यांनी स्वत: ६ हप्ते जमा झाल्यानंतर १२ हजार रुपयांचा धनादेश शासनास परत करून या योजनेतून अपात्र करण्याबाबत पत्र दिले होते. तरीही आज अखेर ११ हप्ते नियमित जमा झालेले आहेत. नको म्हणत असताना ही रक्कम जमा होत असल्याने श्री. शेट्टी यांनी शेवटी मंगळवारी (ता. ६) शिरोळ तहसीलदार सौ. अपर्णा मोरे धुमाळ यांना भेटून या योजनेतून अपात्र करण्याबाबत सुचविले.

मी वारंवार सांगूनही माझ्या खात्यावर पैसे यायचे थांबत नाहीत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी अनेक हेलपाटे घातले तरीसुद्धा त्यांचे पैसे येत नाहीत. काय गौडबंगाल आहे हे कळत नाही.

- राजू शेट्टी, माजी खासदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pesticide Ban: उत्तर प्रदेशात बासमती तांदळावर परिणाम करणाऱ्या ११ कीटकनाशकांवर बंदी

Kharif Crop : नवापूरमधील संततधारेने पिकांना जीवदान

Jalgaon Rainfall : जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ६२ टक्के पाऊस

Crop Damage Survey : अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

Agrowon Podcast: आले दरात सुधारणा; सोयाबीन किंमतीत वाढ, हरभरा स्थिर, शेवगा आवक वाढली, केळीचे दर कायम

SCROLL FOR NEXT