Rabbi Season Agrowon
ताज्या बातम्या

Rajma Cultivation : धारूरमध्ये ६७० हेक्टरवर ‘राजमा’

रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पेरा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ज्वारीचा पेरा घटला असल्याचे चित्र आहे. तर हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे.

Team Agrowon

किल्लेधारूर, जि. बीड ः पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी हंगाम (Rabi Season) यंदा जोरात आला आहे. पेरणी (Rabi Sowing) होऊन ६० ते ७० दिवसांचा कालावधी उलटला असून ज्वारी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तर गहू ओंब्या (Wheat) सोडत आहे. हरभरा (Chana) घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे.

काही भागांत ज्वारीवर लष्करी अळी तर काही ठिकाणी हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. मात्र शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केल्याने पिके जोमात आहेत.

यावर्षी तालुक्यात १७ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली असून राजमा पिकाची ६७० हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.

यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला, मात्र जोरदार झालेल्या परतीच्या पावसाने पाण्याची मोठी उपलब्धी झाली.

यामुळे रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पेरा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ज्वारीचा पेरा घटला असल्याचे चित्र आहे. तर हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे.

मागील चार-पाच वर्षांच्या तुलनेत करडईच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. दरम्यान आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात थंडीचा जोर वाढलेला असून रब्बी पिकांना या थंडीचा फायदा होत आहे. पिके बहरात आली आहे.

पिकांसाठी सध्या परिसरात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने सध्या सर्वच शेतकरी पिकांना पाणी देण्याच्या कामात व्यस्त आहेत.

यावर्षी परतीच्या पावसाने पाण्याची मोठी उपलब्धी झाली. यामुळे पिके जोमात आहेत. बहुतांश शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत सिंचनाचा पर्याय शोधून कमी पाण्यात शेती करीत आहेत. यामुळे पाण्याचा योग्य वापर होत आहे. शेतकरी अभ्यास करून पिकांची लागवड करीत आहेत. परिणामी पिकेही चांगली वाढत आहेत.
लक्ष्मण गायकवाड, कृषी सहाय्यक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गव्हाच्या दरात चढ-उतार, ज्वारीच्या दरात वाढ, शेवग्याच्या दरात बदल, टोमॅटोच्या आवकेत घट तर डाळिंबाचे दर टिकून

Water Storage: गिरणा धरण १०० टक्के भरले; रब्बी हंगामातील पिकांना दिलासा

Farmers Foreign Study Tour: राज्यातील १८० शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी, ४ कोटी निधी मंजूर

Onion Planting Preparations: खानदेशात रब्बी, उन्हाळ कांदा रोपवाटिकांच्या कामांना वेग

Maharashtra Weather Alert: कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; काही भागात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT