Rajaram Sugar Factory Kolhapur agrowon
ताज्या बातम्या

Amal Mahadik VS Satej Patil : राजाराम साखर कारखाना मल्टी डिस्ट्रीक्ट होणार, अमल महाडिकांचे विरोधकांना उत्तर

Amal Mahadik : सभेवेळी सर्व विषय मंजूर करण्यात आले. परंतु कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.

sandeep Shirguppe

Rajaram Sugar Factory Kolhapur : कोल्हापूरच्या कसबा बावड्यात असलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज (ता.२९) शुक्रवारी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली. दरम्यान नोटीस वाचण्यापूर्वीच सभेत गोंधळ सुरू झाल्याने सर्व विषय मंजूर करण्यात आले. परंतु कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर्वाधिक गाजलेल्या कारखाना विस्ताराबाबतच्या नियमावर अमल महाडिक यांनी माध्यमांना माहिती दिली.

यावेळी ते म्हणाले की, राजाराम कारखाना शहरालगत असल्याने या कारखान्याचे वाढीव भांडवल उभे करण्यासाठी व कारखान्याच्या हितासाठी काही विषय ठेवण्यात आले होते. यामध्ये सर्व सभासदांनी एकमुखाने मान्यता दिली आहे. दरम्यान पोटनियमात बदल करून कारखान्यात गावे वाढण्याच्या निर्णयावर विरोधकांनी आवाज उठवला परंतु त्यांना मागच्या ५ महिन्यांपूर्वीच सभासदांनी चांगलच उत्तर दिले आहे.

४२ गावांचा वाढीव मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी विनाकारण दंगा घालत आहेत. त्यांना माझं एकच म्हणण आहे, सभासदांबरोबर बिगर सभासदही या कारखान्याला ऊस घालत असतो यामध्ये बिगर सभासदांची वाढती मागणी लक्षात घेत आम्ही ४२ गावांचा समावेश करण्याचा विचार केला. या सभेत मोजकेच २५ लोक येत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होते, परंतु या सभेत ५ त ७ हजार सभासदांनी आमच्या भूमिकेला मंजूरी दिली आहे.

तुम्हाला सभासद करायचं आहे तर तुम्ही जिल्ह्यातील करा सांगली जिल्ह्यातील का करता असा प्रश्न विचारताच अमल महाडिक म्हणाले की, मुळात कारखान्याचा विस्तार करताना २५ ते ३० किमी अंतरावरील गावांचा समावेश केला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातीलही काही शेतकरी आमच्या कारखान्याला ऊस घालतात.

सध्या कारखाना उत्तर आणि दक्षिण दिशेला वाढला आहे तो चारही दिशांना चालला पाहिजे. या अनुशंगाने आम्ही वारंवार क्रशिंग क्षमताही वाढवत आहोत. यामध्ये कारखान्याला जास्त प्रमाणात ऊस येणे गरजेचे आहे. याचबरोबर मागच्या कित्येक वर्षांपासून या भागातील शेतकरी आमच्या कारखान्याला ऊस घालतात या सगळ्याचा विचार करून आम्ही हा कारखाना मल्टी डिस्ट्रीक्ट करण्याचा निर्णय घेतल्याचे अमल महाडिक म्हणाले.

सतेज पाटलांचा विरोध

राजाराम कारखान्याचे कोल्हापूरमधील कार्यक्षेत्र वाढवत आहात, हे समजू शकतो. मात्र, सांगली जिल्ह्यातील येलूर आणि वाळवा तालुक्यातील सभासद करता यावेत, यासाठीच पोटनियम बदलला जात आहे. यापेक्षा आयत्यावेळेचा एकच विषय आणून राजाराम कारखाना 'महाडिक प्रा. लिमिटेड' करण्याचा 'ठराव करावा', अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली होती.

१२२ गावांतील अनेक सभासदांना ऊसतोड दिली जात नाही. यामुळे ९ हजार सभासदांनी ऊस घातलेला नाही. असे असताना आणखी ४२ गावांतील सभासद कशासाठी हवे आहेत? कारखाना विस्तारवाढीसाठी ज्या-त्या गावातील कारखान्यांचा ना हरकत दाखला घ्यावा लागणार आहे. असेही सतेज पाटील म्हणाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT