Raisn Rate
Raisn Rate Agrowon
ताज्या बातम्या

Raisn Rate : बेदाणा दरात प्रति किलोस १५ ते २० रुपयांची दरवाढ

Abhijeet Dake


अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः गेल्या पंधरा ते वीस दिवसांत बेदाण्याच्या (Raisn) मागणीत वाढ झाली असल्याने बेदाण्याच्या दरात प्रति किलोस १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. गत हंगामातील सुमारे २५ ते ३० हजार टन बेदाणा अजून शिल्लक असून, नवा बेदाणा येईपर्यंत बेदाण्याची पूर्ण विक्री होईल. यंदाच्या हंगामातही बेदाणे दरात वाढ होण्याची शक्यता आहे, असे मत बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

गत हंगामात राज्यात सुमारे १ लाख ८० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. हंगामाच्या सुरुवातीपासूनच बेदाण्याला सरासरी २०० रुपयांपासून २१५ रुपयांपर्यंत असे दर मिळाले होते. दिवाळीपर्यंत सुमारे १ लाख ४० हजार टन बेदाण्याची विक्री झाली असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. दिवाळीनंतर अर्थात शून्य पेमेंटची पूर्तता झाल्यानंतर बेदाण्याचे सौदे सुरू झाले. या वेळी बेदाण्याला १२० ते २२५ रुपये असा दर होता.

बेदाणाच्या सांगली, तासगाव, पंढरपूर या तिन्हीही बाजारपेठांत सौद्याला ३०० ते ४०० टन बेदाण्याची आवक होत असून, तेवढाच बेदाणा विक्री होत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बेदाण्याचा उठावही चांगला होत आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या बेदाण्याला प्रति किलोस १६० ते २५० रुपयांपर्यंत असा दर मिळत आहे. सध्या प्राथमिक अंदाजानुसार २५ ते ३० हजार टन बेदाणा शीतगृहात शिल्लक आहे. वर्षभर मागणी असल्याने बेदाणा उत्पादक शेतकरी टप्प्याटप्प्यानुसार त्याची विक्री करत आहे. नवीन बेदाणा येईपर्यंत गतवर्षीचा बेदाणा पुरवठा येईल.

यंदा द्राक्ष बागा चांगल्या आहेत. पोषक वातावरण असल्याने रोगराईचा प्रादुर्भाव नाही. नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढावले नाही, तर यंदा दर्जेदार बेदाणा तयार होईल, अशी आशा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात बेदाण्याच्या दरात वाढ झाली असल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


फेब्रुवारीत नवा बेदाणा सौद्यासाठी येणार
डिसेंबरच्या मध्यावर बेदाणानिर्मिती सुरू होण्याची शक्यता यंदाच्या हंगामातील बेदाणा निर्मितीसाठी शेडमालक अजूनही पुढे आले नाहीत. येत्या पंधरा दिवसांत बेदाणा शेडची डागडुजी करण्यासाठी पुढे येणार आहेत. डिसेंबरच्या मध्यापासून नवीन बेदाणा हंगाम सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात नवा बेदाणा सौद्यासाठी येईल.


हंगामाच्या सुरुवातीपासून बेदाण्याचे दर टिकून होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांत बेदाण्याला मागणी वाढली असल्याने बेदाण्याच्या दरात वाढ झाली आहे. यंदाचा हंगाम फेब्रुवारीपासून सुरू होईल, अशी शक्यता आहे.
- राजेंद्र कुंभार,
अध्यक्ष, सांगली-तासगाव बेदाणा मर्चंट असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT