Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यातील ४५३ महसूल मंडलांमध्ये पावसाचा खंड

Maharashtra Rain Update : राज्यात गेल्या चार-पाच दिवसांत झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाची आधीची दयनीय अवस्था पूर्णतः हटलेली नाही. उलट, २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड असलेल्या महसूल मंडलांची संख्या आता वाढून ४५३ पर्यंत पोहोचली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात गेल्या चार-पाच दिवसांत झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाची आधीची दयनीय अवस्था पूर्णतः हटलेली नाही. उलट, २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड असलेल्या महसूल मंडलांची संख्या आता वाढून ४५३ पर्यंत पोहोचली आहे.

कृषी आयुक्तालयाच्या एक सप्टेंबरच्या अहवालानुसार, राज्यात २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेल्या महसूल मंडलांची संख्या कमी झालेली नाही.

आधीची संख्या ४०२ होती व ती आता वाढून ४५३ पर्यंत गेली आहे. तसेच १५ ते २१ दिवस पावसाचा खंड असलेल्या गावांची संख्याही वाढली आहे. या गावांचा आकडा ४९१ वरून वाढून आता थेट ६१३ पर्यंत पोहोचला आहे. २५ सप्टेंबरपासून ११ सप्टेंबरपर्यंत राज्यातील जवळपास १०६६ महसूल मंडलांमध्ये पावसाची वानवा आहे.

राज्यात एक जून ते ११ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८९०.४ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात ७६६ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. ‘‘राज्यात सप्टेंबरअखेर अंदाजे २४ टक्के कमी पाऊस झालेला आहे. अर्थात, काही भागांमध्ये पावसाची कमतरता ४० ते ६० टक्क्यांपर्यंत मोठी आहे.

त्यामुळे परतीच्या वाटचालीत मॉन्सून जोरदार न बरसल्यास पिण्याच्या पाण्याचे, चालू खरीप पिकांचे आणि येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकांसमोरील संकट कायम राहील. आमच्या अंदाजानुसार, पावसाच्या खंडामुळे चालू खरिपातील ३० ते ४० टक्के उत्पादनाला फटका बसलेला आहे. त्यात आता सुधारणा होण्याची शक्यता वाटत नाही. मात्र यापुढे पाऊस न झाल्यास नुकसान अजून वाढण्याची भीती आहे,’’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

भात लागवड १५ लाख हेक्टरच्या पुढे

खरीप हंगामात एरवी राज्यभर सरासरी १४२ लाख हेक्टरवर पेरा केला जातो. सध्या हाच पेरा १४१ लाख हेक्टरवर गेला असून, तो सरासरी क्षेत्राच्या ९९ टक्के आहे. सोयाबीनची आतापर्यंत ५० लाख ७२ हजार हेक्टरवर, तर ४२ लाख ३० हजार हेक्टरवर कपाशीचा पेरा झालेला आहे.

याशिवाय ११ लाख १५ हजार हेक्टरवर तूर, नऊ लाख ११ हजार हेक्टरवर मका पेरण्यात आला आहे. राज्यात भाताच्या पेरण्या अजूनही सुरू आहेत. आतापर्यंत भाताची पुनर्लागवड १५ लाख २८ हजार हेक्टरच्या पुढे गेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT