Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

मध्य भारतातील कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. आज (ता. २२) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

पुणे : मध्य भारतातील कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भ (Vidarbha), उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. आज (ता. २२) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता (Rain) आहे. उत्तर भागातील जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

मॉन्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. मंगळवारी (ता. २०) राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला आहे. बुधवारी (ता. २१) मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती. मध्य प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरापासून उत्तर पंजाबपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

विदर्भासह, कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे. आज (ता. २२) उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

जळगाव, औरंगाबाद, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे.

मराठवाडा : परभणी, हिंगोली, नांदेड, बीड.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली.

बुधवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : डहाणू ८०, विक्रमगड, पनवेल, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : राहुरी ६०, नगर ३०.

मराठवाडा : भूम ६०, निलंगा, वाशी, गंगापूर प्रत्येकी ४०, रेणापूर, आष्टी प्रत्येकी ३०.

विदर्भ : गडचिरोली १४०, गोंदिया १३०, देसाईगंज, लाखंदूर १००, गोंदिया, सावळी प्रत्येकी ९०, आरमोरी ८०, ब्रह्मपुरी ७०, मोहाडी, गोंडपिंपरी, गोरेगाव, नागभिड, चामोर्शी प्रत्येकी ६०, कुही, मूल, लाखनी, आमगाव, चिमूर, साकोली, पोंबुर्णा, अहिरी, सिंदेवाही, सालकेसा, पवनी प्रत्येकी ५०, अर्जुनी मोरगाव, भामरागड, तिरोडा, भिवापूर, देवरी, भंडारा, मुलचेरा, सडकअर्जूनी प्रत्येकी ४०.

.पुणे ः गुरुवारी (ता.२२) राज्यातील पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

Lemon Rate: अमरावतीत लिंबाला ६००० ते ७००० रुपये दर

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी

SCROLL FOR NEXT