Weather Updates Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Rain News: राज्यात पाऊस ओसरला

पावसाला पोषक हवामान विरून जाताच राज्यात पावसाने उसंत घेतल्याचे चित्र आहे. अरबी समुद्रातील (Arabian Sea) तीव्र कमी दाबाचे क्षेत्राने कोकण किनारपट्टीवरील बाष्प खेचून घेतले आहे.

अॅग्रोवन वृत्तसेवा

पुणे : जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दमदार कोसळणाऱ्या मॉन्सूनच्या (Monsoon) पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असून, ऊन सावल्यांच्या लपंडावात अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत. कोकण, घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार सरींनी हजेरी लावली आहे.

पावसाला पोषक हवामान विरून जाताच राज्यात पावसाने उसंत घेतल्याचे चित्र आहे. अरबी समुद्रातील (Arabian Sea) तीव्र कमी दाबाचे क्षेत्राने कोकण किनारपट्टीवरील बाष्प खेचून घेतले आहे. विदर्भ, मराठवाड्यात (Marathwada) मात्र ढगाळ हवामान कायम आहे.

रविवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्यांसह, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात (Marathwada) पावसाची उघडीप होती. तर विदर्भासह उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

रविवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग)

कोकण :

रायगड : कर्जत ८०, माथेरान ११६, म्हसळा ४५, सुधागडपाली ४०.

रत्नागिरी : लांजा ६७.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग ९४, कुडाळ ८३, मालवण ४५, सावंतवाडी ७५.

ठाणे : भिवंडी ४५, कल्याण ४५, मुरबाड ४८, शहापूर ४८.

मध्य महाराष्ट्र :

कोल्हापूर : आजरा ९८, गगनबावडा ६६, गारगोटी ४१, पन्हाळा ४८, राधानगरी ८५, शाहूवाडी ५२.

नाशिक : इगतपुरी १२८, पेठ ४४, त्र्यंबकेश्वर ४०.

पुणे : लोणावळा कृषी ११६, वेल्हे ४६,

सातारा : जावळीमेढा ४६, महाबळेश्वर १०७.

विदर्भ :

बुलडाणा : मलकापूर २१, संग्रामपूर २०.

गडचिरोली : अहेरी ३३, भामरागड ३२, सिरोंचा २४.

गोंदिया : आमगाव २१, अर्जुनीमोरगाव २०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गव्हाचे दर टिकून; हळदीत चढउतार, केळीला श्रावणाचा उठाव, आले दरात सुधारणा, मका स्थिरावलेला

Onion Seedling Shortage : कांदा रोपवाटिकांत रोपांची तूट

Women Farmer : महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतमालाची निर्यात प्रेरणादायी

Dam Water Storage : काटेपूर्णा, वाण, खडकपूर्णा, पेनटाकळी प्रकल्पांतील साठ्यात वाढ

Monsoon Rain: विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमीच राहणार

SCROLL FOR NEXT