Rain Update
Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पाच जिल्ह्यातील २७९ पैकी २५९ मंडलांत पाऊस

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत प्रदीर्घ खंडानंतर गुरुवारी (ता. 1) सकाळपर्यंतच्या 24 तासांत पावसाने (Rainfall) 279 पैकी 259 हलकी, मध्यम, दमदार ते जोरदार हजेरी (Heavy Rainfall) लावली. बीड व लातूरमधील प्रत्येकी एक तर उस्मानाबाद मधील दोन मंडलांत अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. पाच जिल्ह्यांतील 20 मंडले वगळता झालेला हा पाऊस पिकांसाठी नवसंजीवनी देणारा ठरला आहे.

जून-जुलैमध्ये तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अतिवृष्टी रुपात बरसणाऱ्या पावसाने खरीप पिकांची चांगलीच दैन केली. त्यानंतर पुन्हा जवळपास पंधरवडा तर काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त कालावधीचा खंड देऊन पावसाने अतिवृष्टीतून वाचलेल्या कोरडवाहू पिकांनाही करपविण्याचे काम केले. पावसाच्या प्रदीर्ख खंडाने आलेला पाऊस पीकांना नव संजीवनी देणारा ठरला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 65 पैकी 62 मंडळात हलका मध्यम ते दमदार पाऊस झाला. 20 मंडळात 20 ते 52 मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली.

जालना जिल्ह्यातील 49 पैकी 46 मंडळात पावसाची हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लागली. 12 मंडळात 20 ते 54 मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. बदनापूर व जालना तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. बीड जिल्ह्यातील 63 पैकी 61 मंडलांत हलका,मध्यम, दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील 22 मंडलांत 30 ते 61 मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. अंबाजोगाई, माजलगाव, बीड, धारूर, वडवणी, शिरूर कासार तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. लातूर जिल्ह्यातील 60 पैकी 48 मंडलांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला.

औसा तालुक्यातील उजनी मंडळात सर्वाधिक 68.5 मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील चाकूर,उदगीर, देवणी, अहमदपूर जळकोट तालुक्यात पावसाचा जोर कमी होता अवसा व लातूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता जिल्ह्यातील बारा मंडळात 25 ते 57 मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व 42 मंडलांत हलका मध्यम ते दमदार पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

औरंगाबाद जिल्हा ः चित्तेपिंपळगाव 25.5, हर्सूल 52.8, आडुळ 25.5, बालानगर 29, पाचोड 36.8 ,गंगापूर 32.5, मांजरी 32.5, लाडगाव 27.3, कन्नड 45.8, चापानेर 45.8, अंभई 28.8, बनोटी 47.3,

जालना जिल्हा ः कुंभारझरी 28.3, जालना शहर 25.3, वाघरूळ 39.3, रामनगर 43, धनगर पिंपरी 36.8, बदनापूर 41.3, शेलगाव 54.5

बीड जिल्हा ः बीड 33.3, म्हालसाजवळा 39.5,नाळवंडी 39.5, राजुरी 46,पिंपळनेर 48.3, पेडगाव 41.5, शिरसदेवी 31.5, माजलगाव 31.8, तालखेड 61.5, नित्रुड ३८.५, दिंद्रुड 47 अंबाजोगाई 50, पातोडा 48.3, लोखंडी 58.8, बर्दापूर 29.3, केज 32.3, हनुमंतपिंपरी ३०.३, नांदुरघाट 40.3, मोहखेड ३८.५, तेलगाव 38.5

लातूर जिल्हा ः लातूर 45, हरंगुळ 45, मुरुड ३०.५ ,गातेगाव 32.3 ,तांदूळजा 31, चिंचोली 45.3, कनेरी 57.8, लामजाणा 36.3, मातोळा 26, पळशी 39

उस्मानाबाद जिल्हा ः जागजी 30.8, तुळजापूर 33.8, परांडा 38, असू 51, अनाळा 50.3, भूम 36.8 , वालवड 42.8, कळंब 38, डाळिंब 25.5, नारंगवाडी 24, लोहारा 26.3, मागणी 31.3, जेवळी 29, वाशी 23.3, तेरखेडा 40.

अतिवृष्टीचे मंडळे

बीड जिल्हा

कवडगाव 66 मिलिमीटर

लातूर जिल्हा

उजनी 68.5 मिलिमीटर

उस्मानाबाद जिल्हा

बेंबळी 68.5 मिलिमीटर

पाडोळी 68.5 मिलिमीटर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

Agriculture Drone : ‘वनामकृवि’मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Cotton Cultivation : आठ राज्यांत अतिसघन कापूस लागवड प्रकल्प

Cotton Market : परभणी, हिंगोलीत कापसाची १२.७० लाख क्विंटल खरेदी

SCROLL FOR NEXT