Ajit Pawar Oath Agorowon
ताज्या बातम्या

Rahul Narvekar : अजित पवार यांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांचे मोठे विधान

Ajit Pawar: राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ९ आमदारांच्या अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यावर विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिला आहे

Team Agrowon

NCP Crisis : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ८ आमदारांनी रविवारी सामील होत मंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने जयंत पाटील यांनी ९ जणांच्या अपात्रतेची याचिका दाखल केली. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात रविवारी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित यांनी राजीनामा देत राष्ट्रवादीमध्ये बंड करीत शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सामील झाले. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर छगन भुजबळ, दिलीप वळसे -पाटील, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

दरम्यान, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट आहे. अजित पवारांच्यासह बंडखोरांच्या विरोधात शरद पवार अॅक्शन मोडवर आले आहे. ते कराड येथे प्रितिसंगमावर दाखल झाले आहेत

दुसरीकडे जयंत पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे ९ आमदारांना अपात्रतेची यात्रिका दाखल केली आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, ९ आमदार ही पार्टी होऊ शकत नाही. त्यांनी केलेली कृती पक्ष आणि पक्षाच्या अध्यक्षांना न सांगता केलेली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी याबबात आम्हांला लवकरात लवकर बोलवावं, ही आमची मागणी आहे, असं जयंत म्हणाले.

यावर राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून याचिकेची पडताळणी करून योग्य कायदेशीर बाबी तपासल्यानंतर ती कारवाई लवकरच केली जाईल, असे नार्वेकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT