PDCC Bank
PDCC Bank Agrowon
ताज्या बातम्या

PDCC Bank : जिल्हा बँकेकडून पारगाव ग्रामपंचायतीला क्यूआरकोड

Team Agrowon

लोणी धामणी : आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील ग्रामपंचायतीला कर वसुलीसाठी (Tax Recovery) पुणे जिल्हा बँकेकडून क्यूआरकोड (PDCC Bank QR Code) उपलब्ध झाल्याची माहिती पारगावचे सरपंच बबनराव ढोबळे यांनी दिली.

ग्रामपंचायत कर वसुलीत घरपट्टी, पाणीपट्टी, गाळा भाडे, बाजारकर व इतर विकास कामांची लोक वर्गणी ग्रामपंचायतीमार्फत गोळा केली जाते. सर्व खातेदारांकडे रोख रक्कम स्वरूपात उपलब्ध होत असते, असे नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वसुलीवर परिणाम होत असल्याचा दिसत होता.

सगळीकडे बऱ्याचदा सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाइन संगणक डिजिटल प्रणालीद्वारे केले जातात. पारगाव ग्रामपंचायतीला क्यूआरकोडची गरज भासू लागल्याने ग्रामपंचायतीने जिल्हा बँकेकडे क्यूआरकोडची मागणी केली होती.

जिल्हा बँकेने क्यूआरकोड उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे खातेदारांना घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरण्यास सुलभ होणार आहे

क्यूआरकोड वितरणप्रसंगी सरपंच बबनराव ढोबळे, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सदस्य सचिन देवडे किरण ढोबळे, ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजने, बँकेचे अधिकारी किसनराव वाळुंज, आनंदराव मेंगडे उपस्थित होते

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगावतर्फे अवसरी बुद्रूक ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत कर वसुलीसाठी अनेकदा अडचणी येत होत्या. सध्याचे युग हे संगणक प्रणालीवर ऑनलाइन आहे. ग्रामपंचायत वसुलीसाठी जिल्हा बँकेकडून क्यूआरकोड उपलब्ध झाल्याने कर वसुलीसाठी मोठी मदत होईल.

- के. डी. भोजने, ग्रामविकास अधिकारी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : खानदेशात वादळी पावसाचा पिकांना फटका सुरूच

Panchaganga River : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी गांभिर्य कोणालाच नाही? पाहणीवेळी अधिकारीच अनुपस्थित

Vilayati tamarind Processing : विलायती चिंचेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

Maize Market : खानदेशात मका आवकेत घट, दरात किंचित वाढ

Green Manuering : जमिनीला आच्छादन अन् उन्हाळ्यात सावलीही

SCROLL FOR NEXT