Pune's Weather Station
Pune's Weather Station Agrowon
ताज्या बातम्या

Pune's Weather Station : पुण्यातील हवामान केंद्र घेतेय भविष्याचा वेध

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

संदीप नवले

पुणे : गेल्या काही वर्षांत बदललेल्या हवामानावर आधारित भविष्याचा नव्याने वेध घेण्यासाठी हवामान विभागाकडून (Weather Department) नवनवीन बदल करण्यात येत आहेत. त्याला शासनामार्फत चांगलेच पाठबळ मिळत असून पुण्यातील हवामान विभाग (Pune's Weather Station) कात टाकत आहे.

देशातील नागरिकांना, शेतकऱ्यांना अचूक अंदाज देण्यासाठी विभागाने आपल्या कार्यपद्धतीमध्ये अनेक बदल केले असून विभाग लोकाभिमुख होण्याकडे वाटचाल करत असून त्याला विभागातील संशोधकांचे चांगलेच पाठबळ मिळत आहे.

देशातीलच नाही, तर जगभरातील हवामानशास्त्राला दिशा देणाऱ्या प्रमुख संस्थांमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाची (आयएमडी) गणना होते.

१४८ वर्षे पूर्ण केलेल्या या संस्थेच्या वाटचालीत ९५ वर्षे संस्थेच्या पुण्यातील विभागांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.

शंभरीकडे वाटचाल करणारे ‘सिमला ऑफिस’ आता आधुनिक आणि लोकाभिमुख होत आहे. त्यादृष्टिने हवामान विभाग वेगाने काम करत आहे.

काही वर्षापूर्वीपर्यंत ‘आयएमडी’च्या शिवाजीनगर येथील आवाराची पुणे वेधशाळा अशी ओळख होती. आता ‘आयएमडी’च्या हवामान संशोधन व सेवेचे (क्लायमेट रिसर्च अँड सव्हिसेस- सीआरएस) हे राष्ट्रीय केंद्र आहे.

याच सोबत हवामानशास्त्रीय उपकरणे, कृषी हवामानशास्त्र आणि हवामानशास्त्रीय प्रशिक्षण या महत्त्वाच्या विभागांची राष्ट्रीय केंद्रे पुण्यातच आहेत. ‘आयएमडी’च्या दिल्ली येथील मुख्यालयानंतरचे प्रमुख केंद्र म्हणून पुण्याची ओळख आहे.

वेधशाळांच्या संख्येत वाढ :
‘आयएमडी’मधून सध्या सुरू असलेल्या हवामानशास्त्रीय सेवा आणि संशोधनाबाबत ‘सीआरएस’चे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, की २००६ मध्ये पृथ्वी विज्ञान मंत्रालय स्थापन झाल्यापासून हवामान अंदाज सुधारणेच्या दृष्टिने राष्ट्रीय पातळीवर मोठी पावले उचलण्यात आली.

त्याला अनुसरून देशभरात ‘डॉप्लर रडार’चे जाळे विस्तारले गेले. जमिनीवरील वेधशांळाची संख्या काही पटींनी वाढविण्यात आली. मॉन्सून हवामानाच्या घटनांना गृहीत धरून अत्याधुनिक उपग्रह हवामान शास्त्रज्ञांसाठी उपलब्ध झाले.

दुसरीकडे या सर्व माहितीचा उपयोग करून स्थानिक पातळीवरील आणि विविध कालावधीसाठीचा हवामान अंदाज देणारी मॉडेल मंत्रालयाअंतर्गत असलेल्या विविध संशोधन संस्थांच्या माध्यमातून विकसित करण्यात आली.

हानी कमी करण्याचे उद्दिष्ट :
‘हवामानाचे सर्व अंदाज ज्यांच्यासाठी तयार करण्यात आले आहेत. त्या सर्व यूजरपर्यंत पोचणे आणि या प्रक्रियेत त्यांनाही सहभागी करून घेण्याचे काम आता आयएमडी करत आहे.

पूर, विजा, दरडी, दुष्काळ यांसारख्या तीव्र हवामानाच्या घटनांची वेळेत माहिती देऊन जीवित आणि आर्थिक हानी कमी करणे यासाठी देशभरातील संशोधन संस्था आणि विद्यापीठांचे सहकार्य घेण्यात येत आहे.

स्थानिक भाषेत हवामानाचा अंदाज :
सोशल मीडिया प्रभावी वापर करतानाच देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना ‘एसएमएस’द्वारे हवामानाची अचूक माहिती सातत्याने पुरवण्यात येत आहे.

स्थानिक भाषांमध्ये आणि स्थानिक पातळीवरील हवामान अंदाज यावर येत्या काळात हवामान विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येतील, असेही सूत्रांनी सांगितले.

‘आयएमडी’कडून राबविले जात असलेले प्रमुख उपक्रम :
- मॉन्सूनचा दीर्घकालीन अंदाज. तिन्ही ऋतुंचा हंगामी अंदाज
- देशभरातील दीर्घकालीन हवामानाच्या (क्लायमेट) नोंदी


- देशातील; तसेच दक्षिण आशियाई देशांसाठी हवामानाशी निगडित सुमारे दोनशे विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण


- देशभरात जमिनीवरील मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक वेधशाळांची बांधणी आणि त्यांची देखभाल
- देशभरातील शेतकऱ्यांसाठी स्थानिक भाषेतील हवामानशास्त्रीय मार्गदर्शन

या सेवांनाही दिले जातेय महत्त्व :
- नागरिकांच्या सहभागातून हवामानाच्या नोंदी
- पुणे जिल्ह्यातील हवामानाची चोवीस तास माहिती पुरवणारे मोबाइल ॲप


- तीव्र हवामानाच्या घटनांचा राष्ट्रीय नकाशा
- ‘आयएमडी’ची वेबसाइट : www.imdpune.gov.in/

गेल्या काही वर्षांतील हवामानाचा अभ्यास केल्यास अनेक बदल झाल्याचे दिसून येते. त्याचा अभ्यास हवामान विभागाकडून केला जात आहे. मात्र, लोकांच्या अपेक्षा वाढत असल्याने आता हवामान विभागाने अधिक लोकाभिमुख होण्यासाठी अनेक बदल केले आहेत. त्यासाठी शासनाची आणि वरिष्ठ, कनिष्ठ सर्व शास्त्रज्ञांची चांगलीच मदत होते.
- डॉ. कृष्णानंद होसाळीकर, प्रमुख, सीआरएस, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

Grain Storage : देशातील धान्य साठवणूक अन् वितरण व्यवस्था

Water shortage : जायकवाडी धरणाने वाढवली छ. संभाजी नगरकरांची चिंता; धाराशिवला टँकरचा आधार

Tomato Disease : टॉमॅटो पिकातील ‘लवकर येणारा करपा’

SCROLL FOR NEXT