Fertilizer Agrowon
ताज्या बातम्या

Chemical Fertilizer : पुरेशी रासायनिक खते उपलब्ध करून द्या

Fertilizer Stock : शेतकऱ्यांनी कृषी विभाग, लोकप्रतिनिधी आदींकडे याबाबत माहिती दिली असून, सुरळीत खतपुरवठ्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : रासायनिक खतांच्या पुरवठ्यात अनियमितता असून, त्याबाबत तातडीने दखल घ्यावी, यासह पिकांच्या नुकसानीबाबत कंपन्यांकडून दिशाभूल होतेय, त्याकडेही लक्ष द्यावे. पावसाने यंदा तारले मात्र कृषी विभागाने शेतकऱ्यांना मारू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी कृषी विभाग, लोकप्रतिनिधी आदींकडे याबाबत माहिती दिली असून, सुरळीत खतपुरवठ्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. खतांचा मोठा वापर जळगाव जिल्ह्यात केला जातो. परंतु शासन त्यासाठी योग्य तरतूद, कार्यवाही करीत नाही.

दरवर्षी खतांचा तुटवडा असतो. त्यात शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. यंदाही हीच स्थिती आहे, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बनावट खते, संप्रेरकेही आहेत. त्याबाबत ठोस कारवाई केली जात नाही. यामुळे कृषी विभागाची भूमिकादेखील संशयाच्या भोवऱ्यात आहे, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

...या केल्या मागण्या

रासायनिक खत बाजारपेठेमध्ये जादा दराने/लिंकिंगने घ्यावा लागत आहेत व काही ठिकाणी खत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याची तत्काळ दखल घेत जळगाव जिल्ह्यात असलेल्या खतांचा बफर स्टॉक रिलीज करावे. गेल्या वर्षी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत जळगाव जिल्हा मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, मका आदी पिकांसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती.

अंदाजे २०० कोटींचा निधी याअंतर्गत प्राप्त झाला होता. या वर्षी देखील योजनेत शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवीत असून, ज्या त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या दूर कराव्यात. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ‘पोकरा’ योजनेच्या योग्य अंमलबजावणीचाही मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Weight Fraud: राज्यातील ऊस उत्पादक ‘काटामारी’च्या चरख्यात;  शेतकऱ्यांची २६०० कोटी रुपयांची लूट

Maharashtra Weather: तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज कायम

Rahul Gandhi On Sharad Pawar: 'इंडिया' आघाडीत शरद पवारांचं स्थान कायम; राहुल गांधींची प्रतिक्रिया

Crop Insurance Rejected :विमा कंपन्यांची मनमानी! कोणतेही कारण न देता शेकडो शेतकऱ्यांचे पीकविमा अर्ज नामंजूर

Satara Rabi Sowing : शेतकऱ्यांची चिंता वाढली; सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्या अजूनही संथ गतीने सुरू

SCROLL FOR NEXT