Pulses Production
Pulses Production Agrowon
ताज्या बातम्या

Pulses Production : मूग, उडदाची उत्पादकता सरासरीपेक्षा जास्त

Team Agrowon

परभणी ः परभणी हिंगोली जिल्ह्यात २०२२ मधील खरीप हंगामातील मूग, उडदाची उत्पादकता (Moong Urad Productivity) पाच वर्षांतील सरासरी उत्पादकतेपेक्षा जास्त आली आहे. पीक कापणी प्रयोगाच्या (Crop Harvesting Experiment) निष्कर्षावरून हे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department) सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी उत्पादकता प्रतिक्विंटल हेक्टरी ८.२२ क्विंटल तर उडदाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ७ क्विंटल आली आहे. हिंगोली जिल्ह्यात मुगाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ६.०१ क्विंटल, तर उडदाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ६.३४ क्विंटल आली आहे.

परभणी जिल्ह्यात २०१६ ते २०२० या पाच वर्षांतील मुगाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ४.६८ क्विंटल आहे. गतवर्षीची (२०२१) सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ६.९२ क्विंटल होती.

२०२२ मध्ये मुगाची उत्पादकता प्रतिहेक्टरी ७.२५ क्विंटल प्रस्तावित असताना १३ हजार १७१ हेक्टरवर (४८.४६ टक्के) पेरणी झाली. शेतकऱ्यांनी ६८ हजार ८१० प्रस्तावाद्वारे २५ हजार ४४४ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले. मुगाचे ३३६ पैकी ३१४ पीक कापणी प्रयोग झाले.

जिल्ह्याची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ८.२२ क्विंटल आली. उडदाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ४.५० क्विंटल, तर २०२१ मधील सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ६.४ क्विंटल आहे.

२०२२ मध्ये प्रतिहेक्टरी ६.२५ क्विटंल उत्पादकता प्रस्तावित असताना ४ हजार ६१६ हेक्टरवर (५०.८४ टक्के) पेरणी झाली. शेतकऱ्यांनी २४ हजार ४७३ प्रस्तावाद्वारे ७ हजार ६१० हेक्टरवरील उडदाचे पीक विमा संरक्षित होते.

उडदाचे २०२ पैकी १२० पीककापणी प्रयोग झाले. सोनपेठ तालुक्यात उडदाचे पीक प्रयोग झाल्याची नोंद नाही. उडदाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ७ क्विंटल आली आहे.

हिंगोली जिल्ह्यात २०१६ ते २०२० या पाच वर्षातील मुगाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ४.४८ क्विंटल, तर २०२१ मधील प्रतिहेक्टरी ७.९५ क्विंटल आहे. २०२२ मध्ये प्रतिहेक्टरी ८.५० क्विंटल उत्पादकता प्रस्तावित असताना ६ हजार ७५८ हेक्टरवर पेरणी झाली. शेतकऱ्यांनी २० हजार ७६६ प्रस्तावाव्दारे ६ हजार ७२० हेक्टरसाठी विमा संरक्षण घेतले. मुगाचे २६४ पैकी २५० पीककापणी प्रयोग झाले. सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ६.०१ क्विंटल आली आहे.

उडदाची पाच वर्षांतील सरासरी उत्पादकता ४.३१ क्विंटल आहे तर २०२१ मधील प्रतिहेक्टरी ५.६४ क्विंटल आहे. २०२२ मध्ये प्रतिहेक्टरी ६ क्विंटल प्रस्तावित असताना ५ हजार ८४२ हेक्टरवर पेरणी झाली.

शेतकऱ्यांनी २० हजार ९४२ प्रस्तावाद्वारे ४ हजार ५६२ हेक्टरसाठी विमा संरक्षण घेतले. उडदाचे २२२ पैकी २१० पीक प्रयोग झाले. सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ६.३४ क्विटंल आली. उत्पादनातील घट या बाबी अंतर्गत विमा भरपाईसाठी उत्पादकतेचे महत्त्व आहे.

खरीप २०२२ मूग उडीद उत्पादकता स्थिती (क्विंटलमध्ये)

तालुका...मूग...उडीद

परभणी...९.०४...७.१५

जिंतूर...७.८७...६.७०

सेलू...७.८७...८.२७

मानवत...८.५१...७.२७

पाथरी...७.२८...४.६९

सोनपेठ...९.०१...००

गंगाखेड...८.३५...६.९१

पालम...७.५२...११.४२

पूर्णा...७.७८...८.२७

हिंगोली...६.५०...७.२२

कळमनुरी...६.०७...६.८२

वसमत...५.६७...५.८४

औंढा नागनाथ...५.६३...५.५२

सेनगाव...६.२४....५.९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT