Jijau Jayanti Agrowon
ताज्या बातम्या

Jijau Jayanti : सिंदखेडराजा येथे ४२५ व्या जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी सुरू

दर वर्षी मराठा सेवा संघातर्फे सिंदखेड राजा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते.

Team Agrowon

बुलडाणा ः मातृतीर्थ सिंदखेडराजा (Sindkhedraja) येथे गुरुवारी (ता.१२) ४२५ वा आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव (Jijau Jayanti) सोहळा जिजाऊ सृष्टी येथे साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुभाष कोल्हे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा ज्योती जाधव, ॲड. राजेंद्र ठोसरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दर वर्षी मराठा सेवा संघातर्फे सिंदखेड राजा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते. या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये महाराष्ट्रासह देश व जगभरातील जिजाऊ भक्त व शिवप्रेमी लाखोंच्या संख्येने सहभागी होतात.

गेले दोन वर्षे जिजाऊ जन्मोत्सव कोरोनाच्या (Corona) गर्तेत सापडला होता. मर्यादित स्वरूपात आयोजन करावे लागले. यंदा मात्र सोहळा गर्दीचा उच्चांक मोडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या सोहळ्यानिमित्त तीन ते १२ जानेवारीदरम्यान सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सव राबवला जात आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने आयोजित केलेला जिजाऊ गाथा हा कार्यक्रम जिजाऊ सृष्टी येथे होणार आहे. या कार्यक्रमामध्ये राज्यातील कलावंत सहभागी होतील. बुधवारी (ता.११) सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सव सांस्कृतिक कार्यक्रमांचे बक्षीस वितरण होईल.

या दिवशी सकाळी ९ ते ४ या वेळेमध्ये संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेद्वारे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सायंकाळी ५ वाजता जिजाऊ जन्मस्थळ, लखुजीराजे जाधव यांच्या राजवाड्यावर जिजाऊ ब्रिगेडने दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या दीपोत्सव कार्यक्रमात सिंदखेड राजा नगरीतील सर्व घरातून माताभगिनी दिवा आणून राजवाड्यावर तेवत ठेवणार आहेत. त्यानंतर ४२५ मशालींसह मशाल यात्रा निघेल. रात्री ८.३० वाजता जिजाऊ सृष्टी येथे जिजाऊ ब्रिगेडचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

गुरुवारी (ता.१२) मुख्य जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात सकाळी ६ वाजता राजवाड्यातील जन्मस्थळी मराठा सेवा संघाच्या प्रमुख जोडप्यासह महापूजा होईल. त्यानंतर सकाळी ७ वाजता वारकरी दिंडी सोहळा निघेल.

सकाळी ९ वाजता जिजाऊ सृष्टी येथे शिवधर्म ध्वजवंदन व सकाळी ९ ते ११ महाराष्ट्रातील नामवंत शाहीर पोवाडे सादर करतील. मुख्य कार्यक्रम दुपारी २ ते ६ या वेळी शिवधर्मपीठ येथे होईल. ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

Turmeric Price Issues: हळद दरप्रश्नी कायमस्वरूपी उपायोजनांसाठी बैठक घ्यावी

Soybean Crop Insurance: सोयाबीनचा १०० कोटी ४५ लाख २० हजार रुपये विमा परतावा देय

Spice Crops Farming: तीन तालुक्यांत मसाला पिकांवर भर

Gokul Dudh Sangh: 'गोकुळ'वरून राजकीय वादाची ठिणगी; दूध संघावर प्रशासक की निवडणूक, नेमकं काय ठरलं?

SCROLL FOR NEXT