Orange Processing Agrowon
ताज्या बातम्या

Orange Processing : सिट्रस इस्टेटमध्येच संत्रा प्रक्रिया केंद्रांना प्राधान्य द्या

Citrus Estate : संत्र्याकरिता पणन विभागाने नागपूर, काटोल, कळमेश्‍वर, मोर्शी (अमरावती), बुलडाणा येथे स्वतंत्र प्रक्रिया केंद्राचा प्रस्ताव दिला आहे.

Team Agrowon

Nagpur News : संत्र्याकरिता पणन विभागाने नागपूर, काटोल, कळमेश्‍वर, मोर्शी (अमरावती), बुलडाणा येथे स्वतंत्र प्रक्रिया केंद्राचा प्रस्ताव दिला आहे. याच जिल्ह्यांत राज्य शासनाने सिट्रस इस्टेटची उभारणी केली असल्याने प्रक्रिया केंद्र याच इस्टेट परिसरात उभारली जावी, अशी सूचना राज्य शासनाच्या अवर सचिव माधवी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांना केली आहे.

संत्र्याची उत्पादकता व दर्जा सुधार या उद्देशाने ७ मार्च २०१९ च्या शासन आदेशान्वये सिट्रस इस्टेटच्या उभारणीला मान्यता देण्यात आली आहे. नागपूर, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यांत या सिट्रस इस्टेट प्रस्तावित आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून या तीनही सिट्रस इस्टेटचे संनियंत्रण होते.

या सिट्रस इस्टेट पूर्णपणे कार्यान्वित झाल्या असल्यास त्यांची फलनिष्पती काय, असा प्रश्‍न उपस्थित करीत त्या कार्यान्वित झाल्या असल्यास याच सिट्रस इस्टेटच्या अंतर्गत संत्रा प्रक्रिया केंद्र उभारता येईल किंवा काय, असा दुसरा प्रश्‍न शासनस्तरावरून उपस्थित करण्यात आला आहे.

पत्रानुसार, सद्यःस्थितीत राज्यातील अमरावती, नागपूर व अकोला या क्‍लस्टर जिल्ह्यांत १९ शीतगृह (कोल्डस्टोरेज), ६ पॅक हाऊस व २१ ग्रेडिंग, वॅक्‍सिंग युनिट आहेत. त्यासोबतच संत्रा क्‍लस्टरमध्ये नोगामार्फत काही प्रक्रिया केंद्र उभारण्यात आली असल्याचे प्रस्तावात नमूद आहे.

ही प्रक्रिया केंद्र कोणत्या ठिकाणी उभारली आहेत, ती पूर्णपणे कार्यान्वित झाली आहेत का, त्याची फलनिष्पती तसेच त्याचे फायदे, तोटे याबाबत तुलनात्मक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नव्याने प्रस्तावित संत्रा प्रक्रिया केंद्राच्या परिणामी राज्यावर येणारा आर्थिक भार पाहता या केंद्राकरिता खासगी क्षेत्राचा सहभाग करून घेणे शक्‍य होईल किंवा नाही याबाबतही माहिती मागविण्यात आली आहे.

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मंडळामार्फत काटोल येथे संत्रा प्रक्रिया उद्योग उभारण्यात आला होता. पुढे त्याचे खासगीकरण झाले. हा अनुभव पाहता धोरण ठरविण्याची गरज आहे. त्यातच राज्य शासनाने खासगी अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली असल्याने त्याचाही विचार संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणीत व्हावा, असेही पत्रात म्हटले आहे.

प्रक्रिया केंद्रांबाबत उत्सुकता

राज्यात संत्र्यासोबतच केळी, आंबा व इतरही फळपिके घेतली जातात. त्यामुळे संत्रा या एकाच फळपिकाकरिता प्रक्रिया केंद्र उभारणे संयुक्तिक ठरणार नाही, असेही पत्रात नमूद आहे. परिणामी ही प्रक्रिया केंद्रे उभी राहतात किंवा नाही हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT