Pomegranate  Agrowon
ताज्या बातम्या

Pomegranate Production : पावसाची दडी, तापमानामुळे डाळिंब उत्पादक अडचणीत

Pomegranate Market : देशात आतापर्यंत सुमारे २० ते ३० हजार हेक्टरवरील बागांमध्ये डाळिंबाचा मृग बहर धरला आहे. मात्र मॉन्सूनपूर्व पावसाची दडी आणि अति तापमान या साऱ्याचा परिणाम डाळिंबाच्या मृग बहरावर होण्यास प्रारंभ झाला आहे.

Abhijeet Dake

Sangli News : देशात आतापर्यंत सुमारे २० ते ३० हजार हेक्टरवरील बागांमध्ये डाळिंबाचा मृग बहर धरला आहे. मात्र मॉन्सूनपूर्व पावसाची दडी आणि अति तापमान या साऱ्याचा परिणाम डाळिंबाच्या मृग बहरावर होण्यास प्रारंभ झाला आहे.

परिणामी, क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. फुलकळींचे सेटिंग होण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कोरडवाहू पट्ट्यात कमी पाणी, पाऊस आणि पोषक वातावरण असल्याने दर्जेदार डाळिंबाचा मृग बहर धरला जातो. अनेक भागांत उपलब्ध पाण्यावर एप्रिल मे महिन्यात आगाप मृग बहर धरण्यासाठी शेतकरी नियोजन करतात. या दरम्यान, शेतकरी बागांची हलकी छाटणी करून त्या ताणांवर सोडतात. या बागा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फुलोरावस्थेत येतात.

दरम्यान, मार्च -एप्रिल म्हणजे उन्हाळी आगाप बहर धरला आहे. या फळ छाटणी केलेल्या बागांमध्ये फुलांचे सेटिंग होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. अति तापमान असल्याने परागीभवन होत नसल्याने कळी बारीक निघत आहे. आता पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे फुलगळीची समस्या उद्‍भवत आहे.

देशात जूनपासून बहर धरण्याची गती वाढली जाते. मात्र पाऊस लांबणीवर पडला आहे. परिणामी, उपलब्ध कमी पाण्यावर बहर कसा धरायचा, असा प्रश्‍न उत्पादकांना पडला आहे. पावसाच्या आशेवर मोजक्या शेतकऱ्यांनी बहर धरला आहे.

१५ हजार हेक्टरने क्षेत्र घटण्याचा अंदाज

देशात गेल्या वर्षी डाळिंबाचा मृग बहर ५० हजार हेक्टरवर होता. परंतु यंदा प्रतिकूल स्थितीमुळे मृग बहर कमी होण्याची स्थिती आहे. यंदा १५ हजार हेक्टरने क्षेत्र घटेल, असा प्राथमिक अंदाज डाळिंब उत्पादक संघाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- सेटिंग होण्यास अडचणी

- पाण्याची कमतरता असल्याने फुलकळींची गळ

- काही ठिकाणी तेलकट रोगाचा प्रादुर्भाव

- अति तापमान असल्याने अपेक्षित कळी निघण्यात अडथळे

लांबलेला पाऊस आणि अति तापमान या साऱ्याचा परिणाम मृग बहर धरण्यावर झाला आहे. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहे. वेळेत पाऊस झाला नाही तर बहरातील क्षेत्र कमी होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

RBI Report : देशातील महागाई दर कमी होणार; रब्बी उत्पादन वाढीचा आरबीआयचा अंदाज 

Soybean Market : सोयाबीनच्या हमीभावाला बारदान्याची अडचण

Pandharpur Wari Management : वारी कालावधीत वारकऱ्यांच्या सुविधांबाबत योग्य नियोजन करावे

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाने पिकांचे अंदाजे २ कोटींचे नुकसान

Rural Development Department : यशवंत पंचायतराज समितीकडून सोलापूर जिल्हा परिषदेची तपासणी

SCROLL FOR NEXT