paddy Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

भातासोबत इतर पिकांची लागवड करा

Team Agrowon

डोंबिवली : मलंगगड पट्ट्यात शेतकरी भाताचे पीक (paddy Crop) मोठ्या प्रमाणात घेतात. भात पिकासोबतच फळभाज्यांचेदेखील उत्पादन माळरानावर घेतले जाते. भातासोबतच कडधान्य व इतर पिकांची लागवड करा, असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम कृषी विभागाकडून राबविला जात आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करताना काय अडचणी येतात, शेतकरी आत्महत्या करण्याचा मार्ग का निवडतो, या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची सुरुवात भात पिकाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना भात पड क्षेत्रामध्ये कडधान्य योजनेंतर्गत पीक प्रात्यक्षिक बियाणे वितरण कार्यक्रम आंभे गावात करण्यात आला. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात विविध विभागांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या वर्षी पाऊस चांगला झाल्याने ठाणे जिल्ह्यात भाताचे जास्त उत्पादन झाले आहे. गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला तर ३५ क्विंटल भाताचे सरासरी उत्पादन निघत होते; परंतु या वर्षी ४० ते ४२ क्विंटल भाताचे उत्पादन निघाले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT