Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : दिल्लीकर चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत

Delhi Rain Update : राष्ट्रीय राजधानी दिल्लीवर ऑगस्टमध्ये पाऊस रुसल्याचेच चित्र आहे. दिल्ली परिसरात सरासरी २२६.८ मिमीच्या तुलनेत ९१.९ मिमी पाऊस पडला. हे प्रमाण ६० टक्के कमी आहे.

Team Agrowon

Delhi Weather Update : राष्ट्रीय राजधानी दिल्लीवर ऑगस्टमध्ये पाऊस रुसल्याचेच चित्र आहे. दिल्ली परिसरात सरासरी २२६.८ मिमीच्या तुलनेत ९१.९ मिमी पाऊस पडला. हे प्रमाण ६० टक्के कमी आहे.

स्कायमेटच्या मते, गेल्यावर्षी ऑगस्ट महिना हा दिल्लीकरांसाठी सर्वाधिक शुष्क महिना ठरला. त्या वेळी केवळ ४२.२ मिमी पावसाची नोंद झाली.

मात्र सर्वाधिक पावसाचा विचार केला तर १९६१ मध्ये दिल्लीत ऑगस्टमध्ये ५८३.३ मिमी पाऊस पडला होता. ऑगस्टमध्ये राजधानीत पावसाची चांगली हजेरी असते. पण पावसाने यंदा ओढ दिली आहे. खाडीत पावसाळी वातावरण तयार न झाल्याने दिल्ली आणि परिसरात पाऊस पोहोचू शकला नाही.

दोन दिवसांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे आकडेवारीत सुधारणा होण्याची शक्यता असून नसल्यासारखीच आहे. मागील महिन्यांत यमुनेची पातळी वाढल्याने दिल्लीतील काही रस्ते आणि नदीकाठचे घरे पाण्याखाली गेली होती. अनेक नागरिक बेघर झाले. मात्र यमुनेचा पूर ओसरल्यानंतर दिल्लीकर चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

देशात गेल्या चोवीस तासांत ईशान्य भारत, अंदमान निकोबार येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. हिमालयाचा पश्‍चिम भाग, उत्तर पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, मध्य कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये काही भागात हलका पाऊस पडला. सिक्कीम, हिमालयाच्या पायथ्याशी असलेले पश्‍चिम बंगाल, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्याचा काही भाग, तेलंगण, दक्षिण छत्तीसगड, उत्तर तमिळनाडू, लक्षद्वीप येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rahul Gandhi: मोदी, शहा हे गद्दार; त्यांनी देश विकला : राहुल गांधी

Heatstroke Cases: उष्माघाताचे राज्यात २१९ रुग्ण

India Growth Rate: भारताचा विकासदर ६.४ टक्क्यांवर

Dam Water Storage: राज्यातील धरणांत ३४ टक्के पाणीसाठा

Brazil Ethanol Production: ब्राझीलचा इथेनॉल उत्पादनावर भर

SCROLL FOR NEXT