Paddy Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Replantation : सिंधुदुर्गात ३ हजार हेक्टरवर भातरोप पुनर्लागवड पूर्ण

Paddy farming : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भातपीक उत्पादन घेतले जाते. यावर्षी मॉन्सून लांबला त्यामुळे खरीप हंगामदेखील लांबणार आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात ५ हजार ६७८ हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या असून आतापर्यंत ३ हजार ९११ हेक्टरवरील भातरोप पुनर्लागवडीचे काम पूर्ण झाले आहे. यावर्षी ६२ हजार ३१४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लागवड होणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भातपीक उत्पादन घेतले जाते. यावर्षी मॉन्सून लांबला त्यामुळे खरीप हंगामदेखील लांबणार आहे. पाण्याच्या उपलब्धतेवर ५ ते ७ टक्के भात रोपवाटिका तयार करण्यात आल्या होत्या. भात रोपवाटिकांतील रोपे पुनर्लागवडीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

आतापर्यंत ३ हजार ९११ हेक्टरवरील भातरोप पुनर्लागवड पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात या खरीप हंगामात ५ हजार ६७८ हेक्टरवर भात रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. मॉन्सूनपूर्व तयार केलेल्या रोपवाटिकांतील पुनर्लागवड आता पूर्णत्वाकडे आहे.

मात्र २३ जूननंतर ५० टक्क्यांहून अधिक भातरोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. यातील रोपे लागवडी योग्य होण्यासाठी आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर पंधरा ते वीस दिवस लागवडीला लागतील, असा अंदाज आहे.

जिल्ह्यात भातरोप पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. यावर्षी ६२ हजार ३१४ हेक्टर क्षेत्र भातपीक लागवडीखाली येणार आहे. आतापर्यंत ३ हजार ९११ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे.
- अरुण नातु, तांत्रिक अधिकारी, जिल्हा कृषी विभाग, सिंधुदुर्ग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Sowing: अतिवृष्टीमुळे ज्वारी पेरणीला जमीन प्रतिकूल; शेतकरी हरभरा आणि गव्हाकडे वळले

Electricity Theft : मराठवाड्यात ११८६ मीटरमध्ये वीज चोरी

Soil Pollution : प्रदूषित माती उपजाऊ करताना...

Coconut Intercropping : नारळ बागेत आंतर पीकपद्धती फायदेशीर

Farmers Loss: स्वामिनाथन आयोगाचा एमएसपी फॉर्म्युला लागू न केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका, ३ लाख कोटींचे नुकसान

SCROLL FOR NEXT