ताज्या बातम्या

Paddy Harvesting : रत्नागिरीत भातकापणी सुरू

गणेशोत्सवानंतर कोसळणाऱ्या पावसाला कालपासून ‘ब्रेक’ लागला आहे. मोकळे आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असे अनुकूल असलेल्या वातावरणाचा त्याचा फायदा उचलत शेतकऱ्यांनी भातकापणीच्या कामाला सुरुवात केली आहे.

Mahesh Gaikwad, टीम ॲग्रोवन

रत्नागिरी ः गणेशोत्सवानंतर कोसळणाऱ्या पावसाला (Rainfall) कालपासून ‘ब्रेक’ लागला आहे. मोकळे आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असे अनुकूल असलेल्या वातावरणाचा त्याचा फायदा उचलत शेतकऱ्यांनी भातकापणीच्या (Paddy Harvesting) कामाला सुरुवात केली आहे. भात कापणीच्या निमित्ताने दोन दिवसांपासून शेतामध्ये लोकांची लगबग वाढली आहे.

जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर भात लागवड झाली आहे. हळव्या भातपिकासह कमी कालावधीचे भातपीक सद्यःस्थितीमध्ये कापणी योग्य झाले आहे. मात्र गणेशोत्सवानंतर सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे कापणीयोग्य झालेले हे भातपीक जमिनीवर कोसळून आडवे झाले आहे. सातत्यपूर्ण पावसामध्ये जमिनीवर आडवे झालेल्या भातपीकाच्या दाण्यांची पुन्हा रुजवात होऊन त्यामध्ये भातशेतीचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात होती.

या चिंतेतून शेतकऱ्यांकडून पावसाच्या जाण्याचा धावा केला जात होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळे आकाश असे वातावरण राहिले आहे. या अनुकूल वातावरणाचा फायदा उचलत शेतकऱ्यांनी भातकापणीला जोमाने सुरुवात केली आहे. भातकापणीच्या निमित्ताने शेतांमध्ये लोकांची लगबग वाढली आहे.

परतीच्या पावसामुळे तयार झालेले भातपीक अनेक शेतांमध्ये जमिनीवर कोसळल्याचे दिसत आहे. परतीच्या पावसाचे सातत्य पाहता जमिनीवर कोसळलेल्या भाताचे दाणे पुन्हा रुजण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात होती. त्यातून, होणाऱ्या नुकसानीची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. मात्र निसर्गाने पुन्हा एकदा रुपडे पालटले असून, पावसाने काहीशी उसंत घेतली आहे.

त्यामुळे जमिनीवर पडलेल्या भाताची कापणी होणार असल्याने भाताचे दाणे रुजून शेतीचे होणारे संभाव्य नुकसान सद्यःस्थितीमध्ये टळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही निःश्‍वास सोडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT