Paddy Harvesting Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Harvesting : परतीच्या पावसामुळे भातकापणी लांबणीवर

परतीच्या पावसाने रोहा ग्रामीण भागात धुमाकूळ घातल्यामुळे भातपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात भातकापणीला सुरुवात होते.

टीम ॲग्रोवन

रोहा, जि. रायगड : परतीच्या पावसाने रोहा ग्रामीण भागात धुमाकूळ घातल्यामुळे भातपिकांचे (Paddy Crop) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात भातकापणीला सुरुवात होते. त्यानुसार ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांनी तशी तयारी केली होती; मात्र अचानक आलेल्या पावसामुळे भातकापणी लांबणीवर गेली आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे.

परतीचा पाऊस अजूनही पडत असल्याने उरली सुरलेली भातशेतीही वाया जाणार की काय, असा प्रश्न तालुक्यातील वाली, भालगाव, घोसाळे, कोलाड, खांब, मेढे या विभागातील शेतकऱ्यांना भेडसावत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक आडवे होऊ लागले आहे. उभे पीक वाया जाताना पाहून शेतकऱ्यांचा कंठ दाटून येत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात आम्ही करायचे काय?

आमच्या पोटापाण्याचा प्रश्न कसा सुटणार? या चिंतेत शेतकरी आहेत.निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच भातशेतीचे प्रमाण घटत चालले आहे. त्यातच बी-बियाण्यांच्या वाढत्या किमती, शेतमजुरांचे वाढलेले दर, खतांच्या वाढत्या किमती याचा भार सहन करत शेतकरी भातशेती करत आहेत. त्यातच पावसाचा कहर होत असल्याने मिळणारे उत्पादन लांबच राहिले आहे. शेतीसाठी केलेला खर्च तरी या पिकांतून निघेल की नाही, याची शाश्वती शेतकऱ्यांना राहिलेली नाही.

निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच भातशेतीचे प्रमाण घटत चालले आहे. त्यातच बी-बियाण्यांच्या वाढत्या किमती, शेतमजुरांचे वाढलेले दर, खतांच्या वाढत्या किमती याचा भार सहन करत शेतकरी भातशेती करत आहेत. त्यातच पावसाचा कहर होत असल्याने मिळणारे उत्पादन लांबच राहिले आहे. शेतीसाठी केलेला खर्च तरी या पिकांतून निघेल की नाही, याची शाश्वती शेतकऱ्यांना राहिलेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT