Eknath Shinde  Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Budget Session 2023 : आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणे हेच आमचे ध्येय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी खेळविणारा हा अर्थसंकल्प आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेतून शेतकऱ्यांना नमन केले आहे. शेतकरी अन्नदाता मायबाप आहे.

Team Agrowon

Maharashtra Budget Session 2023 राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (ता. ९) विधिमंडळात सादर झाला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून शेती क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी खेळविणारा हा अर्थसंकल्प आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेतून शेतकऱ्यांना नमन केले आहे. शेतकरी अन्नदाता मायबाप आहे. दुष्काळी जिल्ह्यात प्रतिमानसी १८०० रुपये देणे हा क्रांतिकारी निर्णय आहे.

आम्ही केवळ सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सरकार म्हणत नाही, तर प्रत्यक्षात काम करत आहोत. आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणे हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी आम्ही काम करत आहोत. गेल्या दोन अडीच वर्षांतील विकासाच्या मार्गावरील मेगा ब्लॉक आम्ही बुलेट ट्रेनच्या माध्यमातून दूर केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अर्थसंकल्पात कुठेही अनैसर्गिक वाढ केलेली नाही. मागील वर्षी पाच लाख २८ हजार कोटींचा अर्थसंकल्प होता. यंदाचा पाच लाख ४८ हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प तयार करताना अपेक्षित खर्चाची तरतूद केली जाते.

जास्त पैसे लागतात त्यात पुरवणी मागण्यांतून पूर्ण केल्या जातात. जोपर्यंत भारत हे विकसनशील राष्ट्र आहे. तोवर कर्जाचा डोंगर कमी करण्याचा विचार करता येणार नाही. कर्जाचे पैसे योग्य जागी खर्च होतात की नाही हे पाहावे लागेल.

जीएसडीपीच्या १७ टक्के कर्ज घेतले आहे. वेगवेगळ्या योजना माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करत आहोत. ज्या १५ ते १९ योजना जाहीर केल्या त्या बंद होत्या, त्याच योजना पुन्हा सुरू केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT