Organic Farming Agrowon
ताज्या बातम्या

Organic Farming : विषमुक्त अन्नधान्यासाठी सेंद्रिय शेती गरजेची

रसायनांच्या अतिरिक्त वापरामुळे शेतीमधील कस कमी होत चालला आहे. पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. पोषणमूल्यांनी युक्त व विषमुक्त अन्नधान्यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कृषी अधिकारी दिनेश शेट्टे यांनी केले.

Mahesh Gaikwad

आजरा, जि. कोल्हापूर : रसायनांच्या अतिरिक्त वापरामुळे शेतीमधील कस (Soil Fertility) कमी होत चालला आहे. पिकांच्या उत्पादनावर (Crop Production) परिणाम होत आहे. पोषणमूल्यांनी युक्त व विषमुक्त अन्नधान्यासाठी (Toxin Free Food) सेंद्रिय शेती (Organic Food) ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कृषी अधिकारी दिनेश शेट्टे यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव उपक्रमातील सेंद्रिय शेती-प्रचार आणि प्रसार मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या संकल्पनेतून लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजना या वर्षीपासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून पंचायत समिती कृषी विभागातर्फे याचा प्रारंभ झाला. तालुका आर्थिक समावेशक शांताराम कांबळे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी उद्देश स्पष्ट केला. गावोगावी स्थापन केलेल्या महिला ग्रामसंघ व बचत गटातातील महिलांच्या सहकार्याने सेंद्रिय शेतीचा प्रसार व प्रचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

शेट्टे यांनी लोकराजा शाहू महाराज सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजना, सेंद्रिय भाजीपाला लागवड, जिवामृत प्रोत्साहन योजना, ऊस पाचट अभियान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना याविषयी माहिती दिली. ग्रोनोर्टी फार्मिंग सोल्युशन्स प्रा. लि. गडहिंग्लजचे संचालक अक्षय घोरपडे यांनी निसर्ग चक्र व त्यातून निर्माण झालेली अन्नसाखळी व सेंद्रिय शेती याबाबत मार्गदर्शन केले. सोहाळेतील प्रगतिशील शेतकरी सूर्यकांत दोरुगडे यांनी शेतीमध्ये राबविलेले विविध प्रयोग व सेंद्रिय शेतीचा अनुभव मांडला. शेणखत हा सेंद्रिय शेतीचा आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले.

तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे, कृषी अधिकारी बी. के. शिसाळ, विस्तार अधिकारी ए. बी. मासाळ, सुशांत येरुडकर, गवळी, श्रीनिवास अपसंगी, रणरागिणी महिला सहभाग संघ अध्यक्षा राजश्री पाटील, ज्ञानज्योती महिला सहभाग संघ अध्यक्षा भाग्यश्री पाटील, कोशाध्यक्ष सुनीता दिवटे उपस्थित होत्या. साधना पाटील यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election: शिंदेंचा निवडणुकीवरील खर्च मोजा, राज्याच्या बजेटच्या किती टक्के?; काँग्रेसचा सवाल

Municipal Result 2025: विटा नगर परिषदेत ५० वर्षांनंतर सत्तांतर

Mahagaon APMC: महागाव बाजार समितीत सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव

Local Body Result: सावंतवाडी, वेंगुर्लेत भाजप, मालवणात शिंदे शिवसेना

Animal Feed Technology: पशू आहारातील मायक्रो इनकॅप्सुलेटेड तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT