Orange Producer Agrowon
ताज्या बातम्या

Orange Producers : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची तिवसा तहसीलवर धडक

तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षांपासून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

टीम ॲग्रोवन

तिवसा, जि. अमरावती : तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना (Orange Producer Farmer) गेल्या चार वर्षांपासून अतिवृष्टीने (Heavy Rain) झालेल्या नुकसानीची (Crop Damage Compensation) मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

या नैसर्गिक आपत्तीची नुकसानभरपाई संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जसबीर ठाकूर यांच्या नेतृत्वात गुरुवारी (ता. १) तिवसा तहसील कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांनी संत्राच्या माळा गळ्यात घालून धडक दिली. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

जिल्ह्यातील काही तालुक्यांत कोरडा दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. परंतु तिवसा तालुका हा फळबाग पिकाच्या नुकसान अनुदानापासून अजूनही वंचित असल्यामुळे संत्रा उत्पादकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे.

अशा अनेक नुकसानग्रस्तांना मदतीचे गाजर दाखवून शासनाने शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करीत काँग्रेसकडून सरकारचा निषेध करण्यात आला. अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांसह आंबिया बहराच्या संत्र्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

जिल्ह्यातील काही तालुक्यांतील संत्रा उत्पादकांना शासकीय मदत प्राप्त झाली. परंतु तिवसा तालुक्यातील शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. मदत देऊन न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

VBG-Ram-ji: ग्रामीण रोजगाराच्या हमीची ऐशी-तैशी

Indian Political Challenges: राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

SCROLL FOR NEXT